प्रयागराजमध्ये चालू असलेल्या महाकुंभात आतापर्यंत 54 कोटींहून अधिक लोकांनी आंघोळ केली आहे. एवढ्या सगळ्या भाविकांमध्ये असे अनेक जण होते जे पवित्र संगमात स्नान करून गंगाजल घेऊन घरी परतले. पण कोट्यवधी लोकांच्या नजरेतून ते चुकलं जे एका महिलेने पाहिलं. संगमात आंघोळ करायला गेलेल्या त्या महिलेला ते दिसलं जे कदाचित इतरांना दिसलं नाही किंवा दिसूनही त्यांनी दुर्लक्ष केलं असेल. पण एका महिलेनं मात्र गंगाजल ऐवजी ती गोष्ट महाकुंभातून घेऊन गेली.
advertisement
आता तुम्ही विचार कराल की गंगाजलपेक्षा काय महत्वाचं असेल किंवा इतर कोणाला दिसले नाही असं त्या महिलेला काय दिसलं असेल, तर ती आहे एक प्रकारच्या पाल्याची भाजी. या भाजीचं नाव आहे बथुआ. म्हणजेच ही बथुआची पानं होती, ज्याचा उत्तर भारतातील लोकांच्या आहारात समावेश आहे.
एक महिला आपल्या कुटुंबासह संगमात आंघोळ करायला आली होती. तिथे जाताना तिची नजर रस्त्याच्या कडेला उगवलेल्या पाल्यावर पडली. जे लोक सामान्य गवत समजून दुर्लक्ष करत होते ते खरंतर बथुआ भाजी होती. बिहार आणि उत्तर प्रदेशातील गावांमध्ये ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. शहरांमध्ये तर त्याची किंमतही खूप असते. महिलेला जशी बथुआ दिसली तशी ती तोडून पिशवीत भरु लागली लागली.
या महिलेचा संगमातून बथुआ तोडून नेण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी याला महिलेची पारखी नजर म्हटले आहे. अनेकांनी लिहिले की, हीच तर आहे आपल्या भारतीय महिलांची खासियत. त्यांना प्रत्येक ठिकाणी गरजू वस्तू दिसतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. व्हिडीओत तुम्ही महिलेला भाजी तोडताना आणि तिला पिशवीत भरताना पाहू शकता.