या व्हिडीओमध्ये कधी मोटीवेश्नल कोट्स असतात, कधी एखादी बाई चहा उकळताना थेट बॉलीवूड डायलॉग बोलते, कधी एखादा तरुण अंगणात काहीतरी कांड करत असतो, तर कधी एखादी सासू-सून जोडी डान्स बॅटल करते. पण या सगळ्यांना मागे टाकत सध्या एक जबरदस्त राडा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या राड्यात एक बाई आणि एक पुरुष चक्क रस्त्यावर WWE स्टाईल भिडलेत.
advertisement
व्हिडिओमध्ये एक बाई आणि एक पुरुष इतक्या ताकदीने भिडले आहेत की ते कुठे आहेत याचं भान देखील त्यांना राहिलं नाही. त्यांचं हे भांडण पाहून पूर्ण ट्राफिक देखील थांबलं आहे. लोक येता जाता ही भांडणं पाहात आहेत. कोण कुणाला काय म्हणालं, हे कळायच्या आधीच ही बाई त्या इसमाच्या गळ्यावर झडप घालते आणि थेट खाली आदळते आणि त्यांच्यात हातापायी सुरु होते.
ते दोघे नवरा-बायको असावेत असं म्हटलं जात आहे. पण व्हिडीओची सत्यता समोर आलेली नाही. हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे देखील कळू शकलेलं नाही.
हा भन्नाट व्हिडिओ ‘@SinghKinngSP’ या X अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. अवघ्या काही तासांत याला हजारोंनी व्ह्यूज मिळाले. लोकांनी तुफान कमेंट्स केल्या. एकाने तर लिहिलं – "आता नवऱ्यांना ‘डिफेन्स ट्रेनिंग’ घ्यावं लागेल!" तर दुसऱ्याने थेट ‘कराटे वाइफ’ असं टॅग केलं!
एकजन म्हणतो – "पुरुष दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेत." तर दुसऱ्याने मजेत लिहिलं "लग्नाआधी जरा एकदातरी बायको कुस्ती खेळणारी आहे का ते पाहा." या व्हिडिओमुळे ‘होममेड WWE’ नात्यांमध्येही असतो हे दाखवून दिलं आहे. काही नेटकरी म्हणाले "ही तर आमच्या घरात रोजची गोष्ट आहे."