TRENDING:

या गावात आहे रामराज्य! 40 वर्षांपासून एकाही नागरिकाने केलं नाही व्यसन; कधीच होत नाहीत भांडण-तंटे

Last Updated:

हे गाव 1984 पासून 'नशाबंदी' धोरण पाळत आहे. येथे ग्रामविकास समितीने दारू बनवणे, विकणे आणि सेवन करणे यावर बंदी घातली आहे. युवक चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत यासाठी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आजकालची तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असताना, गमहरिया गाव मात्र याला अपवाद ठरलं आहे. गेल्या 40 वर्षांपासून या गावाने व्यसनमुक्तीचा आदर्श जपला आहे. 1984 मध्ये गावातील विकास समितीने दारू बनवण्यावर आणि विकण्यावर बंदी घालण्याचा नियम केला, जो आजही कटाक्षाने पाळला जातो. इथे आजही कुणी दारू विकत नाही, कारण गावकऱ्यांनीच एकत्र येऊन ही बंदी घातली आहे. गावाच्या विकासासाठी एक ग्राम विकास समितीही तयार करण्यात आली आहे.
Gamhariya village
Gamhariya village
advertisement

खेळातून तरुणाईला योग्य दिशा

तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून गावात फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात आसपासच्या गावांमधील तरुणही उत्साहाने भाग घेतात. या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, दर आठवड्याला गावाच्या विकासासाठी बैठक होते. यात विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि गावातील लहान-मोठे वाद आपसात सामंजस्याने मिटवले जातात. जे वाद गावात सुटत नाहीत, तेच फक्त पोलीस स्टेशन किंवा कोर्टात जातात.

advertisement

गावात दारूबंदी, प्यायची असेल तर बाहेर जा!

लोकल18 शी बोलताना गावचे प्रमुख बुद्धेश्वर उरांव यांनी सांगितलं की, "आमच्या गमहरिया गावात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात." ते पुढे म्हणाले, "आमच्या पूर्वजांनी 1984 मध्ये ग्राम विकास समिती स्थापन केली आणि तेव्हाच ठरवलं की गावात कोणतंही व्यसन असणार नाही. याचा अर्थ असा की, कोणतीही व्यक्ती दारू बनवणार नाही, विकणार नाही किंवा पिणारही नाही. हा नियम 1984 पासून कायम आहे. जरी काही लोक गावाबाहेर जाऊन दारू पित असले तरी, गावात मात्र कधीच दारू बनवली जात नाही किंवा विकली जात नाही. फक्त विशेष सण-उत्सवांना किंवा पूजांच्या वेळीच एका दिवसासाठी दारू बनवली जाते."

advertisement

वादही गावातच मिटतात!

1984 पासून आजपर्यंत, गावात कोणताही वाद झाल्यास तो आम्ही गावातच एकत्र बसून सोडवतो. फक्त 1-2 कुटुंबांची मालमत्तेशी संबंधित प्रकरणं कोर्टात आहेत, बाकी सर्व प्रकरणं गावातच मिटवली जातात. आमच्या गावातील आदर्श शिक्षक मनोहर तिर्की आणि कृषी विभागाचे सुंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली ग्राम विकास समितीची एकमताने सुरुवात झाली आणि ही परंपरा आजही सुरू आहे. दर आठवड्याला बैठक घेऊन गावाच्या समस्या सोडवल्या जातात.

advertisement

ग्राम विकास समितीचे संरक्षक बंधन उरांव यांनी लोकल18 ला सांगितलं की, "आमच्या गमहरिया गावात 1984 मध्ये ग्राम विकास समितीची स्थापना झाली. भांडणं, जमिनीचे वाद अशा कोणत्याही समस्या किंवा वाद आम्ही समितीच्या माध्यमातून गावातच सोडवतो. आम्ही सर्वजण एकत्र राहतो आणि प्रत्येक समस्येवर समितीच्या माध्यमातून उपाय शोधतो. या गावातील लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त आहे."

advertisement

'व्यसनमुक्ती'च गावाची ओळख!

स्थानिक महिला बिरसी उरांव यांनी सांगितलं की, "गेल्या 40 वर्षांपासून लहान-मोठा कोणताही वाद, जसे की भांडणं, गावातच आपसात सामंजस्याने सोडवली जातात. आमचं गाव एक आदर्श गाव व्हावं अशी आमची इच्छा आहे. गावात कोणताही वाद झाल्यास सर्वजण एकत्र बसून तो सोडवतात. आमच्या गावात कोणत्याही प्रकारचे व्यसन बनवले जात नाही किंवा विकले जात नाही. काही लोक बाहेर जाऊन दारू पीत असले तरी, गेल्या 40 वर्षांपासून गावात दारू किंवा हंडिया बनवली किंवा विकली गेलेली नाही."

हे ही वाचा : 12 महिने 24 तास मिळेल स्वच्छ पाणी! फक्त टाकीत टाका 'हा' लाकडी तुकडा; कधीच जमा होणार नाही शेवाळ

हे ही वाचा : कचरा नव्हे, सोनं! माशांच्या खवल्यांचा 'हा' व्यवसाय करून मच्छिमार होताहेत लखपती; थेट परदेशातून येते मागणी

मराठी बातम्या/Viral/
या गावात आहे रामराज्य! 40 वर्षांपासून एकाही नागरिकाने केलं नाही व्यसन; कधीच होत नाहीत भांडण-तंटे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल