अनेकांना आश्चर्य वाटतं “हे नक्की कशासाठी असतं?” काहींनी तर त्याचा वापर खेळण्यासारखा केला असेल. पण या छोट्याशा वस्तूमागे एक मजेशीर आणि उपयोगी कारण दडलं आहे.
ही वस्तू “पिझ्झा सेव्हर” म्हणून ओळखली जाते. 1980 च्या दशकात अमेरिकेतून याचा वापर सुरू झाला. पिझ्झा गरमागरम बॉक्समध्ये ठेवला जातो. पण त्याला पार्सल करताना किंवा घेऊन जाता, गरम पिझ्झाच्या वाफेमुळे त्याच्या बॉक्सचा वरचा भाग ओला होता आणि कधी कधी तो पिझ्झाच्या वर चिकटतो. अशा वेळी चीज आणि टॉपिंग्स खराब होऊन पिझ्झाचा सगळा आकारच बिघडतो. हे टाळण्यासाठीच पिझ्झा सेव्हर ठेवला जातो.
advertisement
प्लास्टिकच्या या लहान टेबलामुळे बॉक्सचे झाकण पिझ्झ्याला लागत नाही. पिझ्झा नीट सुरक्षित राहतो, टॉपिंग्स जागेवर टिकून राहतात आणि ग्राहकापर्यंत गरमागरम आणि आकर्षक स्वरूपात पोहोचतो. अनेकदा आपण बघतो की पिझ्झा डिलिव्हरीदरम्यान तो हलतो, त्याला लहान मोठे धक्के बसतात, पण या छोट्याशा ‘टेबल’ मुळे चीज खराब होत नाही किंवा ते बॉक्सच्या झाकणाला लागत नाही.
मजेशीर बाब म्हणजे, काही देशांत लोक याचा वापर खरंच लहान टेबलसारखा करतात. चहा ठेवायला, शोपीस म्हणून किंवा मुलांच्या खेळण्यात. आजही पिझ्झा ऑर्डर करताना हा छोटा पांढरा सेव्हर बघून ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं.
पण आता तुमच्या लक्षात आलंच असेल पिझ्झाच्या बॉक्समधलं हे लहान टेबल म्हणजे केवळ सजावट नाही तर पिझ्झ्याचं “सुरक्षा कवच” आहे. छोटसं का असेना, पण खवय्यांच्या आनंदात त्याचं मोठं योगदान आहे.
