एका तरुणीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही तीच तरुणी आहे जिने तिच्या मृत बहिणीची अंगठी स्वतःकडे ठेवली होती. 19 वर्षांची ही तरुणी आहे. तिने पोस्टमध्ये सांगितलं की, तिच्या मोठ्या बहिणीचं वयाच्या सहाव्या वर्षी निधन झालं. जेव्हा ती 12 वर्षांची झाली तेव्हा तिला तिच्या मृत बहिणीच्या वस्तूंमध्ये ही अंगठी सापडली आणि ती तिने तिची आठवण म्हणून स्वतःकडे ठेवी. तरुणी म्हणाली, मी ती अंगठी दररोज घालत नव्हती. मी ती फक्त एका लहान बॉक्समध्ये ठेवत असे आणि जेव्हा मला माझ्या बहिणीची आठवण येत असे तेव्हा ती पाहत असे. माझ्या बहिणीची ही शेवटची गोष्ट होती जी मला माझ्यासारखी वाटली."
advertisement
अरे देवा! ISKCON मंदिराच्या हॉटेलमध्ये KFC चिकन घेऊन घुसला तरुण, पुढे घडलं असं की...
पण अलीकडेच एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान असं काहीतरी घडलं जे तिला अजिबात अपेक्षित नव्हतं.
तिने सांगितलं, तिच्या 27 वर्षीय भावाने अचानक सर्वांसमोर गुडघे टेकून त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आणि जेव्हा त्याने अंगठीचा बॉक्स उघडला तेव्हा तिला तीच अंगठी दिसली जी तिने वर्षानुवर्षे जपून ठेवली होती. ती म्हणाली, त्याने ती देण्यापूर्वी मला विचारलं असतं तर... माझं काही महत्त्वच नाही असं दिसतं," सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या पालकांना सर्व काही माहित होतं आणि त्यांचीही याला मंजुरी होती. जेव्हा तिने तिच्या आईसमोर तिची नाराजी व्यक्त केली तेव्हा तिची आई म्हणाली, "अरे, ही फक्त एक अंगठी आहे. एवढा ड्रामा करू नकोस"
तरी तरुणी स्वतःला रोखू शकली नाही. तिने तिच्या भावाकडून अंगठी परत मागितली. प्रत्युत्तरात, भावाने तिला स्वार्थी म्हटलं आणि त्याचं प्रपोज खराब केल्याचा आरोप केला आणि तिथून निघून गेला. तरुणी बाथरूममध्ये गेली आणि रडू लागली. नंतर तिच्या आईने फोन करून तिला माफी मागायला सांगितलं, पण तिने सरळ नकार दिला तेव्हा तिच्या आईने फोन कट केला. त्यानंतर तिच्या एका चुलत भावाने तिला मेसेज केला आणि म्हटलं, "तू अगदी बरोबर आहेस." मुलीने दुसऱ्या पोस्टमध्ये सांगितलं तिला अंगठी मिळाली आहे परंतु तिच्या कुटुंबातील सदस्य खूप निराश आहेत.
OYO हॉटेलमध्ये बर्थडे, नवरा-मुलंही आले, अंगावरची साडी हातात घेऊन पळाली महिला, पण का? Watch Video
आपण जे केलं ते योग्य आहे की नाही? असं तिने नेटिझन्सना विचारलं. यावर अनेक युझर्सनी तिला पाठिंबा दिला आहे, तिच्या समर्थनार्थ कमेंट केल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, तरुणीने योग्य केलं की नाही याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.