अरे देवा! ISKCON मंदिराच्या हॉटेलमध्ये KFC चिकन घेऊन घुसला तरुण, पुढे घडलं असं की...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man Eat Chicken In Iskcon Restaurant : एक तरुण इस्कॉन मंदिराच्या रेस्टॉरंटमध्ये केएफसी चिकन घेऊन घुसला. तिथंच तो खाऊ लागला इतकंच नव्हे तर त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि तिथं जेवत असलेल्या ग्राहकांनाही त्याने चिकन ऑफर केलं.
नवी दिल्ली : मंदिर म्हटलं की तिथं दारू, मांस याला बंदी असते. मांसाहार केला असेल तर मंदिरात जायचाही कुणी विचार करत नाही. त्यातही इस्कॉन टेम्पल, ज्याचे काही नियम आहेत, इथं कांदा-लसूणही चालक नाही, तिथं एक तरुण मात्र चिकन घेऊन घुसला. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
लंडनच्या इस्कॉन मंदिराच्या रेस्टॉरंटमधील ही घटना आहे. एक तरुण केएफसी चिकन घेऊन इथं घुसला. तिथंच तो खाऊ लागला इतकंच नव्हे तर त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि तिथं जेवत असलेल्या ग्राहकांनाही त्याने चिकन ऑफर केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण फूड पॅकेट हातात घेऊन इस्कॉनच्यागोविंदा रेस्टॉरंटमध्ये जातो. तिथं तो थेट फूड काउंटरवर जातो आणि तिथं उभ्या असलेल्या दोन महिलांना नॉनव्हेज फूड आहे का? असं विचारतो. त्यावर त्या महिला हे शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट असल्याचं सांगतात. मांस, कांदा, लसूण काहीच नाही, असं सांगतात. काउंटरवर उभी असलेली महिला त्याला रेस्टॉरंटच्या बाहेर असलेल्या बोर्डकडे बोट दाखवले, ज्यावर शुद्ध शाकाहारी लिहिलेलं होतं.
advertisement
त्यानंतर तो तरुण त्याच्या हातात असलेल्या बॅगेतून एक बॉक्स काढतो आणि त्यातून चिकन बाहेर काढतो. काउंटरवर उभ्या असलेल्या महिलेने त्याला विचारले की ते काय आहे, तेव्हा तो तिला सांगतो की ते चिकन आहे. केएफसीचं फ्राइड चिकन असतं. ते तो काऊंटरवर ठेवतो आणि खायला सुरुवात करतो. ती महिला त्याला ताबडतोब निघून जायला सांगते, पण तो निघून जाण्याऐवजी रेस्टॉरंटमध्ये फिरतो आणि चिकन खातो इतकंच नाही तर तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांनीही तो चिकन ऑफर करतो.
advertisement
Horrendous. 😳😡
This African-British youth entered into ISKCON’s Govinda restaurant - knowingly that it’s pure Veg restaurant - asked if there’s meat available, then pulled out his KFC box and not only ate chicken (chewed like a 🐷), but also offered others working/eating in… pic.twitter.com/TtPJz9Jg7m
— Tathvam-asi (@ssaratht) July 19, 2025
advertisement
नंतर कसंबसं करून रेस्टॉरंटचा कर्मचारी त्याला तिथून बाहेर काढतो. बहुतेक लोकांनी या व्यक्तीच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे आणि त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
इस्कॉन म्हणजे इंटरनेशनल सोसाइटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस. जगभरात श्रीकृष्णाचे असंख्य भक्त आहेत. या सर्वांसाठी स्थापन करण्यात आलेली ही एक आंतरराष्ट्रीय संस्था इस्कॉनची स्थापना 1966 मध्ये न्यूयॉर्क शहरात झाली, तिचे संस्थापक श्री मूर्ती अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद होते.
advertisement
इस्कॉन मंदिराचे अनुयायी प्रामुख्याने चार गोष्टींना आपला धर्म मानतात. दयाळूपणा, सत्य, मनाची शुद्धता आणि तपश्चर्या. चार नियमांचं ते पालन करतात.
1. इस्कॉन मंदिराचे अनुयायी कांदा, लसूण, मांस, मद्य यांसारखे तामसिक अन्न सेवन करत नाहीत.
2. या लोकांना अनैतिक वर्तन असलेल्या गोष्टींपासून दूर राहावे लागते.
3. प्रत्येकाने एक तास नियमितपणे शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. ज्यामध्ये आपण गीता आणि भारतीय धर्माशी संबंधित धर्मग्रंथ वाचतो.
advertisement
4. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे महामंत्राचा 16 वेळा जप करतात.
Location :
Delhi
First Published :
July 21, 2025 2:01 PM IST
मराठी बातम्या/Viral/
अरे देवा! ISKCON मंदिराच्या हॉटेलमध्ये KFC चिकन घेऊन घुसला तरुण, पुढे घडलं असं की...