अखेर त्या दोन मुलींचा बाप सापडला, गोकर्णच्या गुहेत राहाणाऱ्या रशिन महिलेसंदर्भात मोठा खुलासा

Last Updated:

नीना आपल्या दोन चिमुकल्या मुलींसोबत एका निर्जन गुफेत राहत होती. 6 आणि 4 वर्षांच्या या दोन मुली गुप्तपणे वाढवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी गस्त घालताना 9 जुलै रोजी त्यांना शोधून काढले.

गोकर्णच्या गुहेत राहात होती रशियन महिला
गोकर्णच्या गुहेत राहात होती रशियन महिला
मुंबई : गोकर्णच्या घनदाट जंगलात नुकताच घडलेला एक चकित करणारा प्रकार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की, मागील आठ वर्षांपासून एक परदेशी महिला आपल्या दोन मुलींना घेऊन गुप्तपणे भारतातील गोकर्ण या ठिकाणी एका गुफेत राहत होती. ही महिला रशियन नागरिक आहे जिचं नाव नीना कुटिना आहे.
कोणी महिला गुफेमध्ये आपल्या दोन मुलींसोबत राहित आहे, अशी माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना महिला दिसली. नीना आपल्या दोन चिमुकल्या मुलींसोबत एका निर्जन गुफेत राहत होती. 6 आणि 4 वर्षांच्या या दोन मुली गुप्तपणे वाढवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी गस्त घालताना 9 जुलै रोजी त्यांना शोधून काढले. त्यानंतर या महिलेसंदर्भात सर्वत्र चर्चा सुरु झाली. शिवाय ही महिला सापडल्यानंतर काही प्रश्न देखील पोलिसांसमोर उभे राहिले, ज्यापैकी काहीची उत्तर त्यांना मिळाली आहेत.
advertisement
पोलिसांनाही प्रश्न पडला की, इतक्या वर्ष गुफेत राहणारी ही महिला आई कशी बनली? तिच्या मुलांचा बाप कोण आहे? हा प्रश्न गंभीर होता, पण उत्तर अधिकच धक्कादायक होतं. नीना म्हणाली की तिच्या मुलींचे वडील एक इस्रायली व्यावसायिक आहेत. तिने गोव्यातील गुफेत राहात असतानाच एका मुलीला जन्म दिला होता. ही माहिती तिने थेट पोलिसांना दिली नाही, पण काउंसिलर्सशी बोलताना हे सत्य समोर आलं. यानुसार तिची दुसरी मुलगी देखील याच व्यावसायीकाची असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
advertisement
काय आहे या प्रेमकथेचा पुढचा भाग?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, FRRO (Foreigners Regional Registration Office) ने या इस्रायली व्यक्तीशी संपर्क साधला आहे. तो सध्या भारतात व्यवसायासाठी आला आहे. त्याचा व्यवसाय कपड्यांशी संबंधित आहे आणि नीना हिला तो भारतात आल्यानंतरच भेटला होता. त्यानंतर दोघं प्रेमात पडले.
मात्र आता नीना आणि तिच्या मुलींचं पुढं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. नीना हिचं व्हिसा 2017 सालीच संपला होता. त्यामुळे तिला आणि तिच्या मुलींना बेंगळुरुतील डिटेन्शन सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. रशियाच्या दूतावासाशी संपर्क करून, त्यांना पुढील एक महिन्यात मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
advertisement
FRRO च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीना हिचं एक मूल रशियातही आहे. त्यामुळे ही माहिती चेन्नईतील रशियन दूतावासालाही कळवण्यात आली आहे. सध्या तपास सुरू आहे की, नीना आणि तिच्या मुलींच्या रशिया परतीसाठी तिकीट खर्च कोण उचलणार.
गुफेत राहत होती पण का?
नीनाने सांगितलं की ती अध्यात्मासाठी नाही तर आरोग्यदायी जीवनशैली आणि निसर्गाच्या शांततेसाठी गोकर्णच्या जंगलात आली होती. “मी माझ्या मुलींना इथे मरण्यासाठी नाही आणलं होतं. त्या खूप आनंदी होत्या. झर्‍यात पोहत होत्या, मोकळ्या आकाशाखाली झोपायच्या. त्यांनी पहिल्यांदाच डॉक्टर आणि हॉस्पिटल पाहिलं आहे,” असं नीना भावनिकपणे म्हणाली.
view comments
मराठी बातम्या/Viral/
अखेर त्या दोन मुलींचा बाप सापडला, गोकर्णच्या गुहेत राहाणाऱ्या रशिन महिलेसंदर्भात मोठा खुलासा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement