छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी दारूच्या नशेत भर रस्त्यात गोंधळ घालताना दिसत आहे. पोलिसांशी ती हुज्जत घालताना दिसत आहे. तर तिचा सहकारी तरुण पोलिसांना समजावताना दिसत आहे. रायपूरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या रस्ते अपघातानंतरचा हा व्हिडीओ आहे. ही तरुणी पोलिसांशी ती हुज्जत घालताना दिसत आहे.
advertisement
संत प्रेमानंद महाराजांमुळे उडाली रात्रीची झोप, संतापले लोक, असं काय घडलं?
या व्हिडीओसोबत एक मेसेजही व्हायरल होत आहे. यात ती तरुणी रशियन असल्याचं सांगितलं जात आहे. एका तरुणाच्या मांडीवर ती बसून कार चालवत होती. त्याचवेळी गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार एका दुचाकीला धडकली.
या स्कूटीवरून तीन जण जात होते. हे तिन्ही जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाच्या पायाला फ्रॅक्चर झालंय. शरीरावर अनेक ठिकाणी मार लागला आहे. या जखमा अत्यंत गंभीर आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या प्रकरणात कार चालवणाऱ्या या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.