TRENDING:

बोंबला! बॉयफ्रेंडच्या तोंडात अडकला गर्लफ्रेंडचा हात, पाहून डॉक्टरही शॉक, हे घडलं कसं काय?

Last Updated:

रुग्णालयातील डॉक्टर तेव्हा थक्क झाले जेव्हा एक माणूस त्याच्या प्रेयसीचा हात तोंडात अडकवून वेदनेने ओरडत त्यांच्याकडे आला. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आजवर तुम्ही बर्‍याच विचित्र घटनांबद्दल ऐकलं असेल पाहिलं असेल. पण सध्या इतकं विचित्र प्रकरण चर्चेत आलं आहे की ऐकूनच विश्वास बसणार नाही. एका बॉयफ्रेंडच्या तोंडात त्याच्या गर्लफ्रेंडचा हात अडकला आहे. चीनमधील हे प्रकरण आहे.
News18
News18
advertisement

चीनच्या जिलिन प्रांतात नुकतीच एक विचित्र घटना घडली, जी आता सोशल मीडियाद्वारे जगभरात चर्चेचा विषय बनली आहे.  एका रुग्णालयातील डॉक्टर तेव्हा थक्क झाले जेव्हा एक माणूस त्याच्या प्रेयसीचा हात तोंडात अडकवून वेदनेने ओरडत त्यांच्याकडे आला.  ऑडिटी सेंट्रलमधील एका वृत्तानुसार, ही विचित्र घटना 18 मार्च रोजी एक कपल रुग्णालयात आलं.

महिला म्हणाली, जणू माझा हात मांसाच्या ग्राइंडरमध्ये अडकल्यासारखा वाटत होता. यानंतर, प्रियकराच्या घशातून गुरगुरण्याचा आवाज आला आणि महिलेच्या मनगटापासून कोपरापर्यंत लाळ येऊ लागली. दोघांनीही हात बाहेर काढण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले आणि नंतर रुग्णालयाकडे धावले.

advertisement

लग्नाची पहिली रात्र, नवरीने मोबाईलचा कॅमेरा सुरू केला, सुहागरातचा VIDEO VIRAL

तपासणी दरम्यान, डॉक्टरांना आढळले की त्या माणसाच्या तोंडाच्या स्नायूंमध्ये एक उबळ होती, ज्यामुळे जबडा बंद झाला होता. त्याच वेळी, वेदनेने तो महिलेचा हात जोरात चावत होता, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत होती.

अहवालानुसार, घाबरलेल्या माणसाला शांत करण्यासाठी डॉक्टरांनी संगीत वाजवले आणि त्याच्या तोंडाच्या स्नायूंना आराम देण्यासाठी औषध दिले. मग त्याने त्या महिलेचे मनगट हळू हळू फिरवले आणि 20 मिनिटांत दोघांना वेगळं केलं.

advertisement

हे कपल 'हँड इटिंग' नावाचं व्हायरल सोशल मीडिया चॅलेंज करत होतं. या आव्हानात, महिलेने तिच्या प्रियकराच्या तोंडात तिची मूठ घातली, पण जेव्हा तिने तिचा हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो तोंडात अडकला.

Chanakya Niti : सुंदर तरुणीशी लग्न केल्यानंतर पुरुषांच्या आयुष्यात येतात समस्या

ही घटना सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. यासोबतच इंटरनेटवर व्हायरल होणारी आव्हाने मजेदार वाटू शकतात. परंतु धोकादायक देखील असू शकतात, हा एक धडा आहे. म्हणून कोणताही व्हायरल ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी, त्याच्या संभाव्य धोक्यांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
बोंबला! बॉयफ्रेंडच्या तोंडात अडकला गर्लफ्रेंडचा हात, पाहून डॉक्टरही शॉक, हे घडलं कसं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल