मेलबर्न विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील इतर विद्यापीठांच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. नेचर जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
त्यांनी प्रवाळ समुद्रातील प्रवाळांचे नमुने वापरून 1618 ते 1995 पर्यंतच्या महासागर तापमान डेटाचा अभ्यास केला. या कालावधीची अलीकडील महासागरातील तापमानाशी तुलना केली गेली. अभ्यासात संशोधकांनी 1900 ते 2024 पर्यंतच्या समुद्रातील तापमानाचाही समावेश केला आहे.
advertisement
या ठिकाणचे पाणी 400 वर्षात सर्वात उष्ण
400 वर्षांपासून शास्त्रज्ञांनी कठोर अभ्यास केला आहे. शास्त्रज्ञांना असं आढळलं की ग्रेट बॅरियर रीफचे पाणी गेल्या 400 वर्षांतील सर्वात उष्ण झालं आहे.
जगाचा अंत जवळ आला! पृथ्वीबाबत 400 वर्षांच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांचा धक्कादायक दावा
ग्रेट बॅरियर रीफ, जगातील सर्वात मोठे कोरल रीफ इकोसिस्टम आणि सर्वात जैवविविधांपैकी एक. ग्रेट बॅरियर रीफ मरीन पार्क प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनारपट्टीवरील ग्रेट बॅरियर रीफमधील 300 हून अधिक प्रवाळ खडकांच्या हवाई सर्वेक्षणात रीफच्या दोन तृतीयांश भागामध्ये नुकसान झाल्याचे आढळले. 2016 आणि 2024 दरम्यान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्राचे तापमान वाढल्याने हा प्रकार घडला आहे.
हे पृथ्वीच्या विनाशाचे संकेत
शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या तापमानाबद्दल मोठे दावे केले आहेत. पृथ्वीच्या तापमानात सातत्याने होणारी वाढ रोखली नाही, तर प्रवाळांचे अस्तित्व नाहीसे होईल, असा इशारा संशोधकांनी एका अभ्यासात दिला आहे.
रस्त्यावर अचानक आला खणखण आवाज, पळत आले लोक; पुढे घडलं असं की...
"हे प्रवाळ खडक धोक्यात आहेत आणि जर आपण आपल्या सध्याच्या मार्गापासून दूर गेलो नाही, तर आपल्या पिढीला या महान नैसर्गिक आश्चर्यांपैकी एकाचा नाश होण्याची शक्यता आहे. असं अभ्यासाचे प्रमुख लेखक बेंजामिन हेन्ली म्हणाले. मेलबर्न युनिव्हर्सिटी या अभ्यासाच्या लेखकांनी सांगितले की, जरी ग्लोबल वॉर्मिंग पॅरिस कराराच्या उद्दिष्टांमध्ये ठेवली गेली तरी जगभरातील 70 ते 90 टक्के कोरल धोक्यात येऊ शकतात.