कर्नाटकमधील ही धक्कादायक घटना. कोलार जिल्ह्यातील रहिवासी हरीश बाबू नावाचा एक तरुण. ज्याचं एका तरुणीवर प्रेम होतं. त्याचं लग्नही तिच्याशीच झालं. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. लग्नाच्या दिवशी सर्व काही ठीक होतं. सगळे आनंदी होते. पण लग्नानंतर जे घडलं ते सर्वांना हादरवून टाकणारं होतं.
लग्न करावं की नाही? तुम्हालाही पडलाय प्रश्न? काय चांगलं? सर्वेक्षणातून समोर आली मोठी माहिती
advertisement
लग्नाच्या रात्री हरीश घरी गळफासाला लटकलेल्या अवस्थेत होता. हरीशने त्याच्या लग्नासाठी तीन दिवसांची सुट्टी घेतली होती, पण तो कफन घालून परतला. लग्नाच्या रात्री त्याने आपलं आयुष्य संपवलं. इतकं टोकाचं पाऊल उचण्याइतपत असं काय घडलं हे कुटुंब आणि नातेवाईकांना अजूनही समजू शकलेलं नाही. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.
पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की सुरुवातीला हरीश या लग्नासाठी तयार नव्हता. त्याने लग्न करण्यासही नकार दिला होता. पण मुलीच्या कुटुंबाने त्याच्यावर दबाव आणला आणि शेवटी हरीश रजिस्टर लग्नाला तयार झाला. तसंच प्राथमिक माहितीनुसार, हरीश मृत्यूपूर्वी दारू प्यायला होता. दारूच्या नशेत त्याच्या मनात नकारात्मक विचार आले आणि त्याने हे भयानक पाऊल उचलले असा पोलिसांना संशय आहे. अद्याप याची पूर्ण पुष्टी झालेली नाही.
Suhagraat News : सुहागरातआधी नवरदेवाला फुटला घाम, वडिलांकडे धावत गेला, म्हणाला, बाबा... बाबा...
पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. मुलीचं कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांची चौकशी केली जात आहे. लग्नानंतर काही वाद झाला होता का की हरीश इतर काही कारणामुळे मानसिक तणावाखाली होता हे पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.