हिसारच्या जुगलान गावात राहणाऱ्या कुलदीपने सांगितलं की, त्याचं लग्न 8 वर्षांपूर्वी बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावात राहणाऱ्या मुलीशी झालं होतं. त्याचा संसार एकदम सुरळीत चालला आहे. बिहारच्या जाडिया इथं राहणाऱ्या पवन मंडलने त्याला त्याचा भाऊ हंसराजचं लग्नही बिहारमध्ये करून देणार असल्याचं सांगितलं. घरच्यांनी हे मान्य केलं.
घाबरलेला सिक्युरिटी गार्ड बँकेत गेला, म्हणाला, 'सर माझ्या खात्यात...', अकाऊंट पाहून मॅनेजर धक्क्यात
advertisement
कुलदीप म्हणाला, 30 ऑक्टोबर 2024 रोजी पवन मंडळाने मुलीची आई आजारी असल्याचं सांगू तिच्या उपचारासाठी 7 हजार मागितले आणि 31 ऑक्टोबरला हंसराजचं लग्न करणार असल्याचं सांगितलं.
यानंतर कुलदीप भाऊ हंसराज आणि कुटुंबासह बिहारमधील त्रिवेणगंज इथं पोहोचला. जेव्हा त्याने मुलगी पाहिली तेव्हा त्याला ती आवडली. त्यांनी मुलीचे कपडे आणि दागिन्यांसाठी 91,600 रुपये दिले. हंसराजचं लग्न रात्री झाली. यानंतर मध्यरात्री मुलीच्या कुटुंबीयांनी वधू आणि वराला एका कारमध्ये बसवलं आणि तेसुद्धा बाईकवर बसून कारसोबत निघाले.
छतातून आवाज, रात्र होताच वाढायचा, छत उचलताच कुटुंब काय सगळ्यांच्याच अंगावर काटा
निर्जनस्थळी पोहोचल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबाला त्यांना पिस्तुल दाखवून अडवलं. त्यानंतर त्यांच्याकडील 30 हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यांनी वधूलाही सोबत नेलं. आता कुलदीपने बिहारच्या जादिया पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.