7 मे रोजी हे लग्न होतं. लग्नाची वरात मुलीच्या दारात आली होती. पाहुण्यांचं स्वागत झालं. लग्न सुरू होतं. वरमाला घालण्याचा विधी होता. वर आधीपासूनच स्टेजवर होता. वधू त्याच्याजवळ पोहोचली. पण वराच्या एका कृतीमुळे तिला धक्का बसला. वर थरथर कापत होता. त्याचे हातपास थरथर कापू लागले. तिला संशय आला आणि तिनं लग्नास नकार दिला. त्यामुळे वर पक्षाला वधूशिवाय रिकाम्या हाती आल्या पावली परतावं लागलं.
advertisement
लग्नच करायचं नाही म्हणताय? लग्नाशिवाय कसं आहे आयुष्य? वाढत्या वयातील सिंगल महिलांनी सांगितलं
वराला पकडण्यात आलं आणि त्याला सिलाव पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. चौकशीदरम्यान वराच्या वडिलांनी सांगितलं की त्यांचा मुलगा गांजा ओढतो. जेव्हा त्याला गांजा मिळत नाही तेव्हा त्याचे हातपाय थरथर कापू लागतात.
हे ऐकताच मुलीच्या कुटुंबीयांनी तिलक समारंभात दिलेल्या वस्तू परत करण्याची मागणी केली. चौकशीदरम्यान, वराच्या वडिलांनी त्याच्या व्यसनाबद्दल सांगितले. त्यानंतर वधूने लग्न करण्यास नकार दिला आणि लग्नाची मिरवणूक वधूशिवाय परतावी लागली.
हळदीच्या रात्री नाच नाच नाचली नवरी, नंतर टॉयलेटला गेली, मागोमाग गेली आई, दृश्य पाहून हादरली
सिलाव पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु वधूने नकार दिल्याने लग्न मोडले. मुलाच्या बाजूने वराला दिलेल्या सर्व वस्तू मुलीच्या बाजूने परत केल्या.