हळदीच्या रात्री नाच नाच नाचली नवरी, नंतर टॉयलेटला गेली, मागोमाग गेली आई, दृश्य पाहून हादरली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding news : वधू तिच्या लग्नाबद्दल इतकी उत्साहीत होती की तिने खूप नाचही केला. पण थोड्या वेळाने ती हळू हळू उठली आणि शौचालयात गेली. आईही तिथं पोहोचली आणि तिच्या मुलीची अवस्था पाहून तिला धक्का बसला. क्षणार्धात घरातील वातावरण पूर्णपणे बदललं होतं.
लखनऊ : प्रत्येक मुलगा आणि मुलगी स्वतःच्या लग्नाचं स्वप्न पाहतात. लग्नासाठी खास प्लॅनिंग असते आणि भविष्याबद्दल प्रत्येकाची स्वतःची स्वप्नं असतात. अशीच लग्नाची स्वप्नं पाहिलेली एक तरुणी स्वतःच्या लग्नाच्या हळदीच्या रात्री खूप उत्साही होती. उत्साहात ती खूप नाचली. त्यानंतर टॉयलेटला गेली. तिच्या मागोमाग तिची आईसुद्धा गेली. मुलीची अवस्था पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
उत्तर प्रदेशच्या बदायूंमधील हे प्रकरण आहे. नूरपूर पिनोनी गावातील एका घरात लग्नाची तयारी सुरू होती. नूरपूर पिनोनी येथील रहिवासी दिनेश पाल सिंग यांची 20 वर्षीय मुलगी दीक्षा हिचं लग्न मुरादाबादमध्ये निश्चित झालं होतं. सोमवारी लग्नाची वरात गावात येणार होती. यासाठी तयारी जोरात सुरू होती. रविवारी मेहंदी, हळदीचा कार्यक्रम होता. सर्वजण वधूसोबत मजा करत होते. वधूनंही खूप नाच केला. सगळीकडे फक्त आनंद होता. रात्री दीडच्या सुमारास दीक्षाच्या पोटात दुखू लागलं आणि ती शौचालयात गेली. तिथं तिची प्रकृती आणखी बिकट झाली.
advertisement
ती शौचालयातच खूप वेगाने श्वास घेत होती. मुलीची आई सरोजने तिला सावरेपर्यंत तिची मान ताठ झाली होती. गावातील डॉक्टरांना ताबडतोब बोलावण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दीक्षाचा श्वास थांबला होता. तिचा मृत्यू झाला. वधूच्या मृत्यूमुळे कुटुंबात एकच गोंधळ उडाला. मुलाच्या कुटुंबालाही याबद्दल माहिती देण्यात आली. बातमी ऐकून वराला धक्का बसला. ज्या व्यक्तीसोबत त्याने आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिलं होतं ती आता तिथं नव्हती. तिच्याशिवाय तो कसा जगेल याचा विचार करून त्याची प्रकृती आणखी बिकट होत चालली होती.
advertisement
दिनेश पाल सिंग यांच्या चार मुलांपैकी दीक्षा ही एकुलती एक आणि मोठी मुलगी होती. ती इस्लामनगरमधील एका पदवी महाविद्यालयातून बीएचं शिक्षण घेत होती. कुटुंबातील सदस्यांच्या मते, दीक्षाला हृदयरोग होता. तिच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. वधूचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय आहे.
advertisement
हळदी आणि मेहंदीच्या समारंभात इतकी आनंदी दिसणारी मुलगी काही काळानंतर या जगात राहणार नाही हे कोणाला माहित होते. दीक्षाने तिच्या हळदी समारंभात अनेक फोटोशूट केले होते. मेहंदीच्या वेळीही तिने वधूच्या वेशात फोटोशूट केले. लग्नाआधी वधूच्या मृत्यूमुळे कुटुंबात अशांतता निर्माण झाली आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
May 08, 2025 8:33 AM IST
मराठी बातम्या/Viral/
हळदीच्या रात्री नाच नाच नाचली नवरी, नंतर टॉयलेटला गेली, मागोमाग गेली आई, दृश्य पाहून हादरली