नुकताच एका महिला डॉक्टरने सोशल मीडियावर एक महत्वाची गोष्ट सांगितली. ज्यामुळे ही महिला चर्चेचा विषय बनली आहे. बाळ का होत नाही याचं एक मोठं कारण तिने सर्वांसमोर मांडलं. ते कारण म्हणजे धूम्रपान.
आता तुम्ही म्हणाल की धूम्रपान तर पुरुष करतात मग त्याचा परिणाम बाळ होण्यावर कसा होऊ शकतो ? तर एका महिला डॉक्टरने याचं उत्तर एका प्रयोगाद्वारे दिलं.
advertisement
त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी दोन डबे घेतले. एका डब्यात धूम्रपान न करणाऱ्या पुरुषाचे शुक्राणू होते तर दुसऱ्या डब्यात रोज सिगारेट ओढणाऱ्या पुरुषाचे शुक्राणू होते . आता या दोन्ही डब्यातील शुक्राणू महिला डॉक्टरने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले.
जेव्हा धूम्रपान न करणाऱ्याचे शुक्राणू सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले तेव्हा सगळेच थक्क झाले. कारण त्यात असंख्य शुक्राणू वेगाने हालचाल करत होते. म्हणजेच ते निरोगी होते आणि बाळ होण्यासाठी सक्षम होते. पण जेव्हा सिगारेट ओढणाऱ्या पुरूषाचे शुक्राणू पाहिले तेव्हा ते खूपच कमी संख्येने दिसले आणि त्यांची हालचालही मंद होती. म्हणजेच सिगारेटमुळे त्यांची गुणवत्ता खूपच खराब झाली होती.
यावरून महिला डॉक्टरने सांगितलं की धूम्रपानामुळे पुरूषांच्या शुक्राणूंवर परिणाम होतो आणि त्यामुळे बाळ होण्यास अडचण येते. त्यामुळे जे जोडपं बेबी प्लानिंग कर आहे किंवा बाळ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा पुरुषांनी ध्रुम्रपान पिणं सोडून दिलं पाहिजे.