या पद्धतीला स्थानिक भाषेत “मुकोयोशी” असं म्हणतात. तिथल्या जुन्या परंपरेनुसार जेव्हा एखाद्या श्रीमंत कुटुंबात पुरुष वारस म्हणून नसतो किंवा मुलींच्याच पिढ्या पुढे येतात, तेव्हा व्यवसाय आणि कुटुंबाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी एखाद्या काबिल तरुणाला दत्तक घेतलं जातं. दत्तक घेतलेला तरुण त्या कुटुंबाचं आडनाव स्वीकारतो, वारशाचा हक्क मिळवतो आणि थेट व्यवसायाचा वारसा चालवतो. हे खरंच शॉकिंग आहे ना? इथे आपल्या देशातील बहुतांश तरुणांना करिअरच्या एका पॉइंटला असं वाटतं की अचानक असं काहीतरी व्हावं आणि आपण श्रीमंत व्हावं, एखादी लॉट्री लागावी, किंवा एखादा श्रीमंत व्यक्ती येऊन त्याची संपती आपल्या नावावर करावी. पण हे एखाद्या परीकथे सारखं आहे, कारण हे सत्यात होणं शक्य नाही.
advertisement
पण हे या देशात खरोखर घडत आहे जे आपल्यासाठी शॉकिंग आहे. खरंतर हा प्रकार जपानमध्ये घडत आहे. या देशात सुमारे 98% दत्तक घेण्यात येणारे प्रौढ पुरुषच असतात. कारण कुटुंबाला सक्षम वारस हवा असतो जो त्यांच्या प्रचंड व्यवसाय साम्राज्याचं रक्षण करू शकेल. दत्तक घेतलेल्या तरुणाकडून अपेक्षा असते की तो कंपनीची धुरा सांभाळेल आणि परंपरा पुढे नेईल.
सर्वात महत्वाचं म्हणजे या परंपरेचा अवलंब केवळ सामान्य लोक नाही तर दिग्गज कंपन्याही करतात. Toyota, Suzuki, Kikkoman यांसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांनी ही पद्धत अनुसरली आहे. उदाहरणार्थ, Suzuki कंपनीचे सध्याचे प्रमुख ओसामु सुजुकी हे स्वतः दत्तक घेतलेले वारस आहेत.
एकंदरीत पाहिलं तर ही परंपरा आर्थिकदृष्ट्या स्थिरता आणणारी आणि व्यवसायाचं पिढ्यान्पिढ्या संरक्षण करणारी आहे. या मागचं मूळ कारण आहे. कुटुंबाचं नाव, प्रतिष्ठा आणि वारसा जिवंत ठेवणं.