आपल्याला लहानपणापासूनच हा प्रश्न पडला आहे, शिवाय आपण आपल्या मित्रालाही गोंधळात टाकण्यासाठी हा प्रश्न नेहमी विचारला असेल, याचं योग्य कोणालाच माहित नाही. हा प्रश्न माणसाला शतकानुशतकं सतावत आला आहे. पण आता मात्र शास्त्रज्ञांना याचं उत्तर सापडलं आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ कार्ल सगन यांनी अनेक वर्षांपूर्वी म्हटलं होतं की, “आकाशात जे तारे आहेत, ते पृथ्वीवरील वाळूच्या कणांपेक्षाही जास्त आहेत.” मग कल्पना करा की समुद्रकिनाऱ्यावरील एका मूठभर वाळूत लाखो कण असतात, तर पूर्ण पृथ्वीवर किती अब्जावधी वाळूचे कण असतील पण तरीसुद्धा आकाशातील तारे त्याहून अधिक आहेत, असं विज्ञान सांगतं.
advertisement
मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधील गणितज्ञांनी यासाठी एक विशेष सूत्र तयार केलं. थेट तारे मोजणे शक्य नाही, पण आतापर्यंत दिसलेल्या ताऱ्यांच्या आधारे त्यांनी हा हिशोब मांडला आहे. त्या अंदाजानुसार ब्रह्मांडात शेकडो अब्ज तारे आहेत. प्रत्येक ताऱ्याभोवती किमान एक तरी ग्रह फिरतो, अगदी आपल्या सूर्यासारखा आणि पृथ्वीसारखा.
ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांनी खास केप्लर टेलिस्कोप तयार केला. हा टेलिस्कोप दूरवरच्या तार्यांवर लक्ष ठेवतो. जेव्हा एखादा ग्रह ताऱ्याच्या समोरून जातो, तेव्हा हा टेलिस्कोप ते ओळखतो.
या पार्श्वभूमीवर मोठा प्रश्न असा उभा राहतो की या अफाट ब्रह्मांडात फक्त पृथ्वीवरच जीवन आहे का?
वैज्ञानिक म्हणतात, कदाचित नाही! कारण जेव्हा इतके तारे आणि इतके ग्रह आहेत, तेव्हा कुठेतरी जीवनासाठी योग्य परिस्थिती नक्कीच असणार. भविष्यात मानव अशा ग्रहांवर पोहोचू शकेल किंवा आधीपासूनच एखादी सभ्यता तिथे अस्तित्वात असेल, हेही नाकारता येत नाही.
म्हणजेच, आकाशातील तारे केवळ डोळ्यांना भुरळ घालणारे नाहीत, तर आपल्या अस्तित्वाबद्दल नवे प्रश्न निर्माण करणारे आहेत. विज्ञान आता या प्रश्नांची उत्तरं शोधतंय आणि कल्पनांना हळूहळू वास्तवात बदलतंय.