पण असं असलं तरी देखील अनेकांना हे माहित नाही की व्हिस्की पिण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ज्यामध्ये योग्यप्रमाणात पाणी मिसळलं जातं आणि याचमुळे त्या पेगची चव एकदम भारी लागते.
मग आता प्रश्न असा की व्हिस्कीच्या पेगमध्ये किती पाणी घालावे? हा विषय जुना असून यावर नेहमीच चर्चा होत असते. खरं सांगायचं तर पाण्याची ठराविक बरोबर किंवा चूक अशी मात्रा नसते. व्हिस्की तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही पिऊ शकता.
advertisement
व्हिस्कीमध्ये पाणी का घालतात?
अलीकडेच स्वीडनमध्ये झालेल्या एका अभ्यासातून समोर आलं की योग्य प्रमाणात पाणी घातल्याने व्हिस्कीमधील अनेक महत्त्वाचे कंपाउंड्स खुलतात, जे तिच्या चव आणि सुगंधाला अधिक चांगलं बनवतात. स्कॉच व्हिस्की उद्योगात तर चव आणि सुगंध तपासण्यासाठी व्हिस्की 20% एबीवी (अर्धी व्हिस्की, अर्धं पाणी) इतकी dilute करणं सर्वसाधारण पद्धत आहे.
बर्फ टाकण्याचा प्रश्न
भारतामध्ये बहुतेक वेळा हवामान गरम असतं. त्यामुळे येथे अनेक लोक व्हिस्कीमध्ये बर्फ घालून पिणं पसंत करतात. मात्र बर्फ टाकणं हा वैयक्तिक निर्णय आहे.
विज्ञान काय सांगतं?
वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी व्हिस्कीमध्ये पाणी घालण्याचा परिणाम तपासला. त्यांनी पाहिलं की पाणी घातल्याने व्हिस्कीतील volatile compounds आणि स्वादाचे molecules खुलतात, ज्यामुळे सुगंध आणि चव आणखी चांगली होते. संशोधनानुसार, 60 मिलीलीटर व्हिस्कीमध्ये 20% पेक्षा जास्त पाणी (म्हणजेच साधारण 12 मिलीलीटर) घालू नये.
जास्त पाणी का नको?
20% पेक्षा जास्त पाणी घातल्यास व्हिस्कीतील सूक्ष्म फ्लेवर्स एकत्र मिसळून जातात आणि वेगवेगळ्या चवी जाणवत नाहीत. त्यामुळे तिचा मजा कमी होतो. बाजारात मिळणाऱ्या अनेक व्हिस्कीमध्ये आधीपासूनच थोडं पाणी मिसळून बॉटलिंग केली जाते, जेणेकरून त्यांची तीव्रता (intensity) नियंत्रित राहील.
योग्य पद्धत
जर तुम्हाला व्हिस्कीचा पहिला घोट खूप कडवट, जड किंवा अल्कोहलिक वाटला, तर 4-5 थेंब पाणी घालून पुन्हा एक छोटा घोट घ्या. अजूनही तीव्र वाटल्यास हळूहळू थोडं थोडं पाणी वाढवत राहा, जोपर्यंत तुम्हाला योग्य वाटत नाही. एकदम जास्त पाणी घालून पेय बेस्वाद करण्यापेक्षा थोडं थोडं पाणी टाकणं नेहमी चांगलं.
व्हिस्कीमध्ये पाणी किती घालावं याचा कुठलाही सार्वत्रिक नियम नाही. ही वैयक्तिक आवड आहे आणि तुम्हाला जशी आवडते तशी प्या. पण साधारण नियम असा व्हिस्कीतील अल्कोहलच्या प्रमाणानुसार पाणी हळूहळू घाला आणि जेव्हा चव तुम्हाला सर्वाधिक आनंददायी वाटेल, तेव्हा तोच तुमच्यासाठी योग्य प्रमाण.
