आज आम्ही तुम्हाला खरी आणि बनावट लसूण ओळखण्यासाठी 5 सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. चला त्या सविस्तर जाणून घेऊ. या ट्रिक्सने तुमचे पैसे तर वाचतीलच शिवाय आरोग्याचा त्रास देखील उद्भवणार नाही.
रंग आणि आकार
खरा आणि बनावट लसूण यामधील सगळ्यात महत्वाचा फरक हा त्याचा रंग आणि आकार आहे. खरा लसूण हा हलका पिवळा आणि ऑफ व्हाइट रंगाचा असतो तर, शिवाय यावर हलकी माती लागलेली असते. तसेच हा लसून थोडा कडक असतो. तर खोटा लसून हा खूप पांढरा, चमकदार आणि प्लेन असते जो तुम्हाला प्लास्टिक सारखा भासेल आणि हा लसून थोडा नरम असतो.
advertisement
लसूनचं वजन आणि आकारावरुन देखील खरं आणि खोट्याची ओळख ठरली जाते. खरं लसूण आकाराने थोडं वजनदार असतं तर खोटं लसूण हे वजनात थोडं हलकं असतं. त्याच्या कळ्या लहान किंवा मध्यम आकाराच्या असतात आणि सर्व एकाच आकाराच्या नसतात. तर बनावट लसूण वजनाने खूप हलका असतात आणि त्याच्या कळ्या एकाच आकाराच्या किंवा खूप मोठ्या असू शकतात.
लसणाचा तीव्र वास असेल तर तो खरा असतो आणि हीच त्याची ओळख आहे. तर बनावट लसणाला एकतर वास नसतो किंवा खूप सौम्य वास असतो.
खरा लसूण त्याच्या तंतूंवरून ओळखता येतो. कारण त्याच्या खालच्या भागात पातळ आणि नाजूक असे भरपूर तंतू असतात. बनावट लसणात कमी तंतू असतात, तर ते जाड आणि कडक असते.
बनावट लसूण कसा बनवला जातो? बनावट लसूणला चायनीज लसूण असेही म्हणतात, ज्यामध्ये रसायनांचा वापर केला जातो. हे लसूण पिकवण्यासाठी भरपूर रसायने आणि कीटकनाशके वापरली जातात जी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. म्हणून, लसूण खरेदी करण्यापूर्वी, या गोष्टींचा नक्कीच विचार करा.