TRENDING:

रात्री घरी परतला पती; पत्नीच्या रूममधून येत होते विचित्र आवाज, दरवाजा उघडताच सरकली पायाखालची जमीन

Last Updated:

मंगळवारी रात्री हा तरुण दुकान बंद करून घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी दिसत नव्हती. दरम्यान त्याला बेडरूममध्ये हालचाल ऐकू आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : पती-पत्नीचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. या नात्यात प्रेमा इतकंच विश्वासालाही महत्त्व असतं. मात्र, एकदा तो विश्वास तुटला की नातं तुटायलाही फार वेळ लागत नाही. असं असतानाही अनेकदा दोघांच्यातील कोणीतरी एक दुसऱ्याची फसवणूक करत असल्याच्या घटना समोर येतात. असंच एक हैराण करणारं प्रकरण आता समोर आलं आहे. यात पत्नीचं सत्य समजताच पतीला धक्का बसला आणि त्याने थेट पोलिसांत धाव घेतली.
प्रियकरासोबत होती पत्नी (प्रतिकात्मक फोटो)
प्रियकरासोबत होती पत्नी (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील आहे. या प्रकरणाने पतीसह संपूर्ण कुटुंब हैराण झालं. या घटनेतील महिला तिच्या प्रियकराला आपल्या घरी बोलावत असे. ही महिला आपल्या प्रियकराच्या प्रेमात इतकी बुडाली होती की तिला तिचा नवरा घरी परत आल्याचंही समजलं नाही. पती घरी परतला आणि त्याला हे दोघेही एकाच खोलीत दिसले, तेव्हा तो रागाने लाल झाला. पतीने पोलिसांकडे संरक्षणाची मागणीही केली आहे.

advertisement

मंदिरात गेलेले बापलेक; फरशीवर पाय ठेवताच जमिनीतील भुयारात कोसळले अन्..अकोल्यातील भयानक घटना

कौशांबीच्या पिपरी पोलीस स्टेशन हद्दीतील बाजारपेठेत एका तरुणाचं दुकान आहे. मंगळवारी रात्री हा तरुण दुकान बंद करून घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी दिसत नव्हती. दरम्यान त्याला बेडरूममध्ये हालचाल ऐकू आली. तरुण जेव्हा बेडरूमच्या दिशेने गेला तेव्हा त्याला त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह आढळली. पत्नीला दुसऱ्या व्यक्तीच्या कुशीत पाहून तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. तरुणाने आरडाओरड केला असता घरातील लोकही जमा झाले. ही बाब घरच्यांना कळल्यावर त्यांनाही महिलेचं कृत्य ऐकून धक्काच बसला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

आपल्या पत्नीच्या कुकर्मामुळे संतप्त झालेल्या तरुणाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तरुणाच्या घरी पोहोचले. मात्र, तोपर्यंत महिलेचा प्रियकर फरार झाला होता. आपल्या सुरक्षिततेची याचना करत तरुणाने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मराठी बातम्या/Viral/
रात्री घरी परतला पती; पत्नीच्या रूममधून येत होते विचित्र आवाज, दरवाजा उघडताच सरकली पायाखालची जमीन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल