TRENDING:

मोठ्याने ओरडल्यावर इथे फ्री मिळते आईस्क्रीम, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO

Last Updated:

आईस्क्रीमची वाढती क्रेझ पाहून कंपन्यांनीही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम मार्केटमध्ये आणायला सुरुवात केलीय. एवढंच नाही तर ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी ते हटके ट्रिकही वापरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आईस्क्रीम खायला लहान ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. आईस्क्रीमची वाढती क्रेझ पाहून कंपन्यांनीही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम मार्केटमध्ये आणायला सुरुवात केलीय. एवढंच नाही तर ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी ते हटके ट्रिकही वापरतात. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये आईस्क्रीम घ्यायला लावणारी ही ट्रिक पाहून तुम्हीही चकित व्हाल. लोक ओरडून आईस्क्रीम मिळवत आहे. हे वाचून विचित्र वाटले मात्र याचा व्हिडीओही समोर आलाय.
मोठ्याने ओरडल्यावर इथे फ्री मिळते आईस्क्रीम
मोठ्याने ओरडल्यावर इथे फ्री मिळते आईस्क्रीम
advertisement

आपली आईस्क्रीम जास्त विकली जावी यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु असते. यासाठी ते नवनव्या टीप्स आणि ट्रिक्सही वापरतात. यातील काही विक्रेत्यांची ट्रिक कामी येते तर काहींची फेल होते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ग्राहक ओरडून आईस्क्रीम मिळवत आहेत. ओरडून फ्री आईस्क्रीम मिळवण्याची ही स्कीम लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Snake Fact: कोणत्या सापाचं विष जास्त लवकर चढतं? किती वेळ माणूस राहू शकतो जिवंत!

advertisement

ओरडून फ्री आईस्क्रीम मिळवा ही स्कीम इंटरनेटवर वाऱ्यासारखी व्हायरल होतेय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आईस्क्रीम मशीन आहे ज्याच्या पुढे काही अंतर ठेवून ग्राहक ओरडतात. त्यांच्या आवाजाने मशीनची स्क्रीन वर झाली तर आईस्क्रीम फ्री मिळतेय. मोठ्याने जोरात ओरडल्यावरच समोरची मशीन रिएक्ट करते. तरच आईस्क्रीम फ्री मिळते. हळू ओरडल्यावर आईस्क्रीम फ्री मिळत नाही.

advertisement

अनेक लोकांनी ओरडून फ्री आईस्क्रीम मिळवली तर काहींना हे शक्य झालं नाही. @Rainmaker1973 X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 15 सेकंदांच्या हा व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ सिंगापूरचा असल्याचा दावा केला जातोय.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
मोठ्याने ओरडल्यावर इथे फ्री मिळते आईस्क्रीम, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल