मध्यरात्री घडली घटना
30 जूनच्या मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास मंडीच्या धरमपूर भागातील सियाटी गावात मुसळधार पाऊस पडत होता. नरेंद्र नावाचा गावकरी त्याच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपला होता. त्याला जाणवले की, त्याचा कुत्रा अचानक मोठ्याने भुंकू लागला. नरेंद्रने सांगितले की, मध्यरात्रीच्या सुमारास पाऊस पडत असतानाच कुत्रा भुंकायला लागला.
कुत्र्याने दिले धोक्याचे संकेत
advertisement
"मी कुत्र्याच्या भुंकण्याने जागा झालो. जेव्हा मी त्याच्याजवळ गेलो, तेव्हा मला घराच्या भिंतीला एक मोठी भेग दिसली आणि त्यातून पाणी घरात शिरू लागले होते. मी कुत्र्याला घेऊन धावत खाली आलो आणि घरातील सर्वांना जागे केले," असे नरेंद्रने सांगितले. त्यानंतर नरेंद्रने गावातील इतर लोकांनाही जागे केले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले. मुसळधार पाऊस सुरूच होता आणि लोकांनी सर्व काही सोडून आश्रय घेतला.
भूस्खलनाने उद्ध्वस्त झाले गाव
थोड्याच वेळात गावात भूस्खलन झाल्यामुळे गाडले गेले, ज्यात सुमारे डझनभर घरे उद्ध्वस्त झाली. आता गावात फक्त चार-पाच घरे दिसत आहेत. बाकीची सर्व घरे भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली दबून गेली. गेल्या सात दिवसांपासून वाचलेले लोक त्रिंबाला गावात बांधलेल्या नैना देवी मंदिरात आश्रय घेत आहेत. दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक गावकऱ्यांना उच्च रक्तदाब आणि नैराश्याचा त्रास होत आहे. या घटनेनंतर इतर गावांतील लोक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सरकारकडून 10000 रुपयांची मदत दिली जात आहे.
हिमाचलमध्ये पावसाने 78 बळी घेतले
20 जून रोजी मान्सून सुरू झाल्यापासून हिमाचल प्रदेशात कमीत कमी 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 50 लोकांचा मृत्यू भूस्खलन, पूर आणि ढगफुटीसह पावसाशी संबंधित घटनांमध्ये झाला. तर, 28 लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) दिली आहे. या घटनेत हिमाचल प्रदेशातील सियाटी गावात एका कुत्र्याने वेळीच भुंकून 67 गावकऱ्यांचे प्राण वाचवले.
हे ही वाचा : 26 फूट लांबीच्या अजगरच्या पोटातून निघाला 63 वर्षांचा शेतकरी; भयानक दृश्य बघून गावकऱ्यांची उडाली झोप!
हे ही वाचा : Ajab Gajab : 'या' स्त्रिया कधीच करत नाहीत आंघोळ; स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी करतात अशी गोष्ट, ऐकून चक्रावाल