Ajab Gajab : 'या' स्त्रिया कधीच करत नाहीत आंघोळ; स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी करतात अशी गोष्ट, ऐकून चक्रावाल

Last Updated:

अंघोळ करणं हा आपल्या दररोजच्या गोष्टींमधली महत्वाची गोष्ट आहे आणि हायजिनच्या हिशोबाने अंघोळ करणं खूपच महत्वाचं आहे. पण येथील लोकांच्या मान्यतेनुसार महिलांनी अंघोळ केली नाही तर त्या जास्त सुंदर दिसतात.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : आजच्या युगात आपण सगळेच आधुनिकतेच्या वेगात जगतोय. पण अजूनही जगात काही अशा आदिवासी जमाती आहेत ज्या आजही आपली पारंपरिक जीवनशैली, रीतीभाती आणि अनोखे सौंदर्यसाज जपून आहेत. अफ्रिकेतील अशीच एक आदिवासी जमात आहे आणि येथील लोकांच्या सैंदर्याची भाषा काही वगळीच आहे. त्यामुळे हे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
अंघोळ करणं हा आपल्या दररोजच्या गोष्टींमधली महत्वाची गोष्ट आहे आणि हायजिनच्या हिशोबाने अंघोळ करणं खूपच महत्वाचं आहे. पण येथील लोकांच्या मान्यतेनुसार महिलांनी अंघोळ केली नाही तर त्या जास्त सुंदर दिसतात.
ही आदिवासी जमात नामीबिया देशातील आहे. "हिम्बा" जमात (Himba Tribe) असं त्याचं नाव आहे. विशेषतः इथल्या महिलांसाठी ही जमात प्रसिद्ध आहे.
advertisement
हिम्बा जमात उत्तरेच्या "कुनैन प्रांतात" राहते, जिथं पाणी खूपच कमी आहे. पण पाण्याच्या टंचाईनंतरही इथल्या महिला आपलं सौंदर्य, संस्कृती आणि परंपरा मोठ्या अभिमानाने जपतात.
या महिलांचं वैशिष्ट्य काय?
इथल्या महिलांबद्दल सगळ्यात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे या महिलांनी संपूर्ण आयुष्यात एकदाही आंघोळ केलेली नसते! होय, हे ऐकायला विचित्र वाटू शकतं, पण हे खरं आहे. कारण त्यामागे कारण आहे. पाण्याची तीव्र कमतरता. पण अंघोळ करत नाहीत म्हणून त्या अस्वच्छ राहत नाहीत.
advertisement
या महिला एक खास झाडाच्या पानांचा धूर घेतात. या झाडाला ओमुजुम्बजुम्ब म्हणतात. त्याचा धूर शरीरावरून घेतल्यामुळे त्यांना एक नैसर्गिक सुगंध येतो आणि शरीरही स्वच्छ राहतं. हेच त्यांचं ‘आंघोळ’ करण्याचं पारंपरिक आणि उपयुक्त तंत्र आहे.
हिम्बा महिलांच्या लालसर त्वचेमागे आहे एक खास लेप ओत्जिजे (Otjize) आहे. ही पेस्ट मातीसारख्या गेरू (red ochre) आणि प्राण्यांच्या चरबीपासून तयार केली जाते. ही पेस्ट त्वचेला सुर्यकिरणांपासून, माशांपासून आणि कोरड्यापणापासून वाचवते. हा लेप सौंदर्याचा आणि अभिमानाचा एक प्रतीक मानला जातो.
advertisement
इथल्या महिलांचे केस हे त्यांचं सौंदर्य आणि ओळख ठरतात. त्या ओत्जिजे लेप केसांनाही लावून ठेवतात. केसांची ही स्टाईल त्यांच्या वय, वैवाहिक स्थिती आणि सामाजिक स्थान दर्शवते. लहान मुलं, विवाहित महिला, वृद्ध यांचे केस वेगळ्या पद्धतीने मांडले जातात. त्यावर मोती, कौळ्या आणि कातड्याचं सुशोभनही केलं जातं.
हिम्बा समाजातील अजून अशा काही परंपरा आहेत. ज्या आश्चर्यजनक आणि बाहेरच्या लोकांना धक्का देणारी परंपरा आहे. ‘ओकुजेपा ओमोकामे’. याचा अर्थ असा की, एखादा विशेष पाहुणा घरी आला, तर घराचा पुरुष आपल्या पत्नीला त्या पाहुण्यासोबत रात्र घालवण्याची परवानगी देतो. ही प्रथा पाहुणचार आणि आदर दाखवण्याचं लक्षण मानलं जातं.
advertisement
हिम्बा जमातचं जीवन कठीण असलं तरी त्यांनी आपली संस्कृती, सौंदर्य आणि परंपरा आजही जशीच्या तशी जपली आहे. त्यांचं जग वेगळं आहे, पण तेही खूप काही शिकवून जातं.
मराठी बातम्या/Viral/
Ajab Gajab : 'या' स्त्रिया कधीच करत नाहीत आंघोळ; स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी करतात अशी गोष्ट, ऐकून चक्रावाल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement