वाईट प्रथांबद्दल बोलायचं झालं तर त्यात बांगलादेशातील एका समुदायाचा उल्लेख नक्कीच होतो. बाप-मुलीचे नातं या समाजात कलंकित आहे. सहसा वडिलांना मिठी मारताच मुलीला सर्वात सुरक्षित वाटतं, मात्र इथल्या मुलींना त्याच बापाची भीती वाटते. यामागील कारणही खूप भीतीदायक आहे. खरं तर बांगलादेशातील या समुदायात मुलगी तरुण होताच तिचे वडील तिचा नवरा बनतात.
advertisement
नवरीची साडी 17 कोटींची तर मेकअप 30 लाखाचं; देशातील सर्वात चर्चीत आणि महागडं लग्न
आम्ही बोलत आहोत बांगलादेशातील मंडी जमातीबद्दल. या जमातीत शतकानुशतके एक विचित्र प्रथा चालत आली आहे. इथे तरुण वयात स्त्री विधवा झाली तर पुरुष तिच्याशी पुनर्विवाह करतो. या लग्नात तो तिला बायकोचे सर्व हक्क देतो. तिला सांभाळतो. पण जर स्त्रीला पहिल्या लग्नापासून मुलगी असेल तर तो ही मुलगी वयात येताच तिच्याशीच लग्न करतो. याच अटीवर तो विधवेशी लग्न करण्यास तयार होतो. म्हणजे ज्या व्यक्तीला मुलगी लहान वयात बाप म्हणून हाक मारते, तिच व्यक्ती तरुण होताच तिचा नवरा बनते.
मंडी जमातीतील लोक शतकानुशतके ही वाईट प्रथा पाळत आहे. या प्रथेमुळे ते दोन महिलांना सावरतात, असं ते सांगतात. आधी विधवा आई आणि नंतर तिच्या मुलीला. मात्र या दुष्ट प्रथेने आजवर अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मंडी जमातीतील ओरोला नावाच्या मुलीने या दुष्ट प्रथेचा पर्दाफाश केला होता. तिने सांगितलं, की ती लहान असतानाच तिचे वडील वारले होते. त्यानंतर तिच्या आईने दुसरं लग्न केलं. ओरोला त्या व्यक्तीला आपले वडील मानायची. मात्र, ती वयात येताच याच व्यक्तीने तिच्यासोबत लग्न केलं.