असाच एक व्हिडिओ ब्रिटनमधील बर्मिंघम शहरातून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक भारतीय विद्यार्थिनी असं काहीतरी करताना दिसते की हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला, शिवाय लोक यावर मिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडिओत काय दिसतंय?
व्हिडिओच्या सुरुवातीला ती मुलगी कारच्या खिडकीवर टकटक करते. कार मालक खिडकी खाली करताच ती म्हणते, “सर, 20 पाउंड द्या.” (सुमारे 2,300 रुपये). कार मालक विचारतो, “कशासाठी?” त्यावर ती उत्तर देते, “मी तुमच्या कारचं काच पुसलंय.”
advertisement
त्यावर कार मालक म्हणतो, “तुम्ही फक्त पटकन पुसलंय. 20 पाउंड?” मुलगी सांगते, “हो, कारण इथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप आहे.” त्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद होतो.
मुलगी कारसमोर उभी राहते आणि म्हणते, “तुम्हाला जायचं असेल तर मला धक्का द्यावा लागेल.” तरीही कार मालक तिला पैसे देण्यास नकार देतो. मुलगी मात्र वारंवार पैसे मागत राहते.
व्हिडिओ खरा की बनावटी?
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही जणांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी याची सत्यता संशयास्पद ठरवली. काही युजर्स म्हणतायत की हा व्हिडिओ खरी घटना नसून स्क्रिप्टेड आहे, लोकांचं लक्ष वेधण्यासाठी तो बनवला आहे. एका युजरने लिहिलं, “अशी वागणारी मुलगी भीक मागतेय, कोण तिला पैसे देईल?” तर दुसऱ्याने तिला “इंटरनॅशनल भिकारी” म्हटलं.
काही जणांचं म्हणणं आहे की या मुलीनं या कार मालकाशी मिळून अनेक व्हिडिओ बनवले आहेत आणि हा त्यापैकीच एक आहे, हा व्हिडीओ फक्त व्हायरल प्रसिद्धीसाठी आहे.