TRENDING:

Weird Village - भारतातील या गावात पुरुषच बनवतात स्वयंपाक; लहानपणापासूनच मिळतात कुकिंगचे धडे

Last Updated:

स्वयंपाकींचं गाव म्हणून भारतातलं हे गाव ओळखलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चेन्नई, 04 नोव्हेंबर :  सामान्यपणे स्वयंपाक म्हटलं की ती महिलांची ड्युटी असं असतं. तसं काही पुरुषही स्वयंपाक करण्यात निपुण असतात. असे कितीतरी पुरुष शेफ आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक असं गाव जिथं प्रत्येक पुरुष कुक आहे. सर्व पुरुष अगदी उत्तम स्वयंपाक बनवतात. त्यांना लहानपणापासूनच कुकिंगचे धडे दिले जातात.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

स्वयंपाक ही एक कला आहे. प्रत्येकाला ही कला शिकता येत नाही. त्यामुळे आयुष्यभर स्वयंपाक करूनही काही जण स्वादिष्ट अन्न तयार करू शकत नाही. पण भारतातलं असं गाव जिथं ही कला शिकणारे शेकडो लोक आहेत. या गावात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला  स्वयंपाकाची कला अवगत आहे. त्यामुळे या गावाला  स्वयंपाकींचं गाव म्हणतात.

तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील कलयुर हे गाव. जे आचाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात प्रवेश करताच तुम्हाला दुरूनच खाद्यपदार्थांचा आणि मसाल्यांचा घमघमाट येईल. दक्षिण भारतात कलयुर हे गाव अन्नाच्या बाबतीत स्वर्गासारखे आहे. इथल्या जेवणाची चव लोकांना खूप आवडते.

advertisement

Weird Law - विद्यार्थ्यांनी शाळेला 'इतके' दिवस दांडी मारली तर पालकांना जेल

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इथली खासियत म्हणजे इथल्या प्रत्येक घरात एक स्वयंपाकी असतो. इतकंच नाही तर कलयुर हे भारतातील 200 सर्वोत्कृष्ट पुरुष कुकचं घर आहे. आता प्रश्न असा पडतो की हे गाव पाकड्यांचा बालेकिल्ला कसा बनला? सुमारे 500 वर्षांपूर्वी रेडदियार नावाची जात तिथं राहत होती, जी उच्च दर्जाची मानली जात होती. तो उद्योगपती असायचा. त्यांनी स्वयंपाकाची जबाबदारी खालच्या जमातीतील वानियार लोकांना दिली. हे लोक स्वयंपाक करण्यात अत्यंत निपुण होते कारण त्यांना अनेक गुप्त पाककृतींचं ज्ञान होतं. ज्यामुळे ते ब्राह्मण लोकांपेक्षा स्वयंपाकात चांगले होते.

advertisement

त्या काळात शेती हा फायद्याचा व्यवसाय नव्हता, त्यामुळे लोक स्वयंपाकाचा छंद जोपासू लागले, जेणेकरून त्यांना नोकरी मिळावी. इथून ही परंपरा सुरू झाली. आजकाल, कलयुरचे आचारी सुमारे 6 महिने दक्षिण भारतात प्रवास करतात आणि वेगवेगळ्या जत्रेत किंवा कार्यक्रमात स्वयंपाक करून लोकांची मने जिंकतात. याशिवाय लग्न आणि वाढदिवसालाही ते जेवण बनवतात. असं म्हणतात की त्यांना सर्व आवश्यक साहित्य पुरवलं तर ते केवळ 3 तासांत हजारो लोकांसाठी अन्न तयार करू शकतात.

advertisement

Knowledge - वॉश बेसिनला का असतो हा छोटा एक्स्ट्रा होल? एमर्जन्सीमध्ये मोठा कामाचा

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कलयुरमध्ये स्वयंपाकी बनणं सोपं नाही. त्याचं प्रशिक्षण लहानपणापासून सुरू होतं. सगळ्यात आधी लोकांना भाजी कापायला शिकवलं जातं. याशिवाय, त्यांना शेतातून ताजी फळे आणि भाज्या तोडायलाही शिकवलं जाते. ही कला शिकत असताना त्यांना नवीन प्रकारचे पदार्थ बनवायला शिकवलं जाते. हे 10 वर्षे चालू राहते, त्यानंतर स्वयंपाकी स्वतःचे मदतनीस ठेवतो आणि एक संपूर्ण संघ तयार करतो. प्रत्येकाला त्याच्या कौशल्याची खात्री पटते.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Weird Village - भारतातील या गावात पुरुषच बनवतात स्वयंपाक; लहानपणापासूनच मिळतात कुकिंगचे धडे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल