आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे फक्त 7 हजार रुपये भरुन कसं एखाद्या देशात रहाता येणार? आणि हा असा देश आहे तरी कोणता? चला याबद्दल जाणून घेऊ
या देशातील Permanent Residency फी अवघी 7 हजार रुपये आहे. योग्य कागदपत्रं आणि अटी पूर्ण केल्यास युरोपमध्ये नवं जीवन सुरू करण्याची संधी मिळू शकते आणि हा देश आहे पुर्तगाल.
advertisement
पुर्तगालचं PR मिळाल्यानंतर तुम्हाला त्या देशात काळमर्यादा न ठेवता राहण्याचा अधिकार मिळतो. दरवेळी व्हिसा वाढवण्याची गरज राहत नाही. यामुळे नोकरी, शिक्षण, आरोग्य सेवा आणि युरोपातील 26 शेंगेन देशांमध्ये व्हिसा न घेता प्रवास करण्याची मुभा मिळते. मात्र मतदानाचा आणि सरकारी नोकरीचा अधिकार मिळत नाही. PR मिळवण्यासाठी भारतीयांना किमान 5 वर्षं वैध रेसिडेन्सीवर राहणं, आर्थिक स्थैर्य दाखवणं आणि पुर्तगाली भाषेचं मूलभूत ज्ञान सिद्ध करणं गरजेचं आहे.
अर्ज कसा करावा?
भारतातील अर्जदारांनी दिल्ली किंवा मुंबईतील VFS सेंटर मध्ये अर्ज सादर करावा लागतो. यासाठी लागणारी काही महत्वाची कागदपत्रं:
पासपोर्ट व दोन फोटो, पुर्तगालमधील राहण्याचा पुरावा, आर्थिक स्थिती दाखवणारे दस्तऐवज, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट, आरोग्य विमा, अर्ज करण्याचं कारण सांगणारा पत्र
अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला चार महिन्यांच्या आत पुर्तगालला जाऊन रेसिडेन्स परमिटसाठी अर्ज करावा लागतो. तिथे SEF ऑफिस मध्ये मुलाखत व बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. हा संपूर्ण प्रोसेस साधारण 6 ते 12 महिने लागू शकतो.
जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर पुर्तगालचा गोल्डन व्हिसा (Golden Visa) हा लोकप्रिय मार्ग आहे. यात 5 लाख युरो (सुमारे 5.1 कोटी रुपये) किंमतीची मालमत्ता खरेदी करून PR मिळवता येतो. त्याशिवाय नोकरी, दीर्घकाळ कायदेशीर वास्तव्य किंवा कौटुंबिक पुनर्मिलनाच्या आधारावरही अर्ज करता येतो. दोन वर्षांनंतर पती-पत्नी आणि मुलांसाठीही अर्ज करता येतो.
हे मिळाल्यानंतर फायदे काय?
PR मिळाल्यानंतर तुम्हाला युरोपभर स्वतंत्र प्रवासाची संधी, उत्तम शिक्षण व आरोग्य सुविधा, सुरक्षित वातावरण, समृद्ध जीवनशैली आणि समृद्ध संस्कृतीचा आनंद, भारतीयांसाठी स्वागतार्ह वातावरण मिळेल.