TRENDING:

Instagram आता बदललंय, तुम्ही पाहिलात का? रिल्सवरील Friends टॅब कसं काम करतं? 3 नवीन अपडेट लगेच जाणून घ्या

Last Updated:

इंस्टाग्रामचं ऑगस्टमध्येही नवीन फिचर आलं आहे, जे पाहून अनेक युजर्सना आश्चर्य झालं आहे. तसेच हे फीचर कसं काम करतं? त्याचे फायदे काय? असे प्रश्न ही अनेकांच्या मनात उपस्थीत झाले आहेत. चला याबद्दल माहिती घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचं महत्त्व वाढत चाललं आहे. विशेषतः इंस्टाग्राम हे अ‍ॅप तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतं. तरुणांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, फूड ब्लॉगरपासून ते बिझनेस अकाउंटपर्यंत सगळेच इथे सक्रीय आहेत. सुरुवातीला हे ऍप फोटो किंवा व्हिडीओ आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यापूर्तंच आलं होतं, पण नंतर इथे मेसेज, रिल्स, बिझनेस सारख्या गोष्टी अपडेट होत गेल्या. त्यामुळे आता हे ऍप फक्त फोटोज-व्हिडीओ शेअर करण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर हे आपल्या रोजच्या लाइफस्टाईलचा भाग बनलं आहे.
instagram 2025 update
instagram 2025 update
advertisement

लोक इथे अपडेट राहतात, ट्रेंड्स फॉलो करतात, स्वतःच्या कल्पना मांडतात आणि काहींचं तर याच अ‍ॅपवरून करिअरही सुरू झालंय. त्यामुळेच इंस्टाग्राम (Instagram new features) आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स घेऊन येतं, जेवढं युजर फ्रेंडली, तेवढंच क्रिएटिव्ह.

इंस्टाग्रामचं ऑगस्टमध्येही नवीन फिचर आलं आहे, जे पाहून अनेक युजर्सना आश्चर्य झालं आहे. तसेच हे फीचर कसं काम करतं? त्याचे फायदे काय? असे प्रश्न ही अनेकांच्या मनात उपस्थीत झाले आहेत. चला याबद्दल माहिती घेऊ.

advertisement

इंस्टाग्रामकडून युजर्ससाठी तीन धमाकेदार फिचर्स लॉन्च करण्यात आले आहेत: Reposts Tab, Live Map आणि Reels मधील Friends Tab, चला तर मग पाहूया, हे तीन फिचर्स नक्की काय आहेत:

1. Reposts Tab (what is Repost on Instagram)

पूर्वी एखादा Reel किंवा पोस्ट शेअर करायचं म्हटलं की ते Story वर ठेवावं लागाचं किंवा त्याला डाउनलोड करुन पुन्हा अपलोड करावं लागायचं, पण आता इतकी झंझट करण्याची गरज नाही. इंस्टाग्रामने अधिकृतपणे युजर्सना सार्वजनिक Reels आणि पोस्ट्स स्वतःच्या प्रोफाइलवर रीपोस्ट करण्याची सोय दिली आहे (How to repost Reels).

advertisement

हे रीपोस्ट्स आपल्या मुख्य Grid मध्ये दिसणार नाहीत. यासाठी एक वेगळा Reposts Tab प्रोफाइलमध्ये तयार होईल. हे कंटेंट आपल्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचू शकतं. रीपोस्ट करताना, एक छोटी नोटही जोडता येईल ज्याला Pop-up Thought Bubble नाव देण्यात आलं आहे.

advertisement

विशेष म्हणजे या अपडेटमुळे आता मूळ क्रिएटरला त्याचं श्रेय किंवा क्रेडिट देणं सोप्पं जाईल.

2. Live Map (what is Instagram Live Map)

Snapchat च्या Snap Map प्रमाणेच, इंस्टाग्रामने आता Live Map नावाचं नवं फिचर आणलं आहे, ज्यामुळे आपण पाहू शकतो की आपले मित्र आणि फेव्हरेट क्रिएटर्स सध्या कुठून पोस्ट करत आहेत.

advertisement

हे Location Sharing डिफॉल्टने बंद असतं. तुम्ही निवडू शकता की कोणासोबत लोकेशन शेअर करायचं. All Friends, Close Friends, काही निवडक लोक किंवा कोणीही नाही असे पर्याय तिथे आहेत. काही लोकेशन्ससाठी लोकेशन ब्लॉक करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

Live Map हे आपल्या DM Inbox च्या टॉपवर पाहायला मिळेल. सध्या हे फिचर US मध्ये सुरू झालं असून लवकरच जागतिक स्तरावरही येणार आहे.

3. Friends Tab in Reels (what is friends feature on instagram)

इंस्टाग्राम Reels आता आणखी सामाजिक बनत आहेत. नवीन Friends Tab मध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांनी कोणत्या रील्सवर लाईक, कमेंट किंवा शेअर केलं आहे ते पाहता येईल.

यामुळे तुमच्या मित्रमंडळींचे आवडते ट्रेंड्स काय आहेत, ते कोणते रिल्स पाहातायत हे सहज लक्षात येईल. यामुळे Reels मधील ट्रेंडिंग कंटेंट अनुभवणं आणखी मजेदार होणार आहे.

इंस्टाग्रामचं हे अपडेट युजर्सचा सोशल एक्सपिरियन्स अधिक रिच आणि कनेक्टेड बनवतंय. कंटेंट शेअरिंग, लोकेशन आधारित कन्व्हर्सेशन आणि मित्रांशी डिजिटल कनेक्शन मजबूत करण्यासाठी या तीन नव्या फिचर्सची जोड निश्चितच आकर्षक आहे.

जर तुम्ही इंस्टाग्रामवर सतत अपडेट राहणारे युजर असाल, तर हे तीन फिचर्स तुमच्यासाठी गेमचेंजर ठरू शकतात.

मराठी बातम्या/Viral/
Instagram आता बदललंय, तुम्ही पाहिलात का? रिल्सवरील Friends टॅब कसं काम करतं? 3 नवीन अपडेट लगेच जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल