बी-2 बॉम्बर्स अमेरिकेच्या व्हाईटमन एअर फोर्स बेस, मिसूरी इथं ठेवण्यात आले आहेत. पण ते ग्वाम आणि डिएगो गार्सिया सारख्या परदेशी तळांवरूनदेखील उड्डाण करतात. बी-2 बॉम्बर्सनी 1999 मध्ये सर्बिया, 2001 मध्ये अफगाणिस्तान आणि 2003 मध्ये इराकवर हल्ला केला. 2008 मध्ये एक बी-2 बॉम्बर्स क्रॅश झाला. 2022 मध्ये झालेल्या अपघातानंतर आणखी एक बॉम्बर्स निवृत्त करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेकडे सध्या 19 बी-2 बॉम्बर्स सेवेत आहेत.
advertisement
World War III : तिसरं महायुद्ध सुरू झालं? आपल्याला कसं समजणार? कशी होते याची घोषणा?
याची खासियत काय?
हे विमान अण्वस्त्रंदेखील वाहून नेऊ शकतं. या विमानाच्या पृष्ठभागावर एक विशेष प्रकारचं साहित्य लावलं जातं. हे साहित्य रडारचे किरण शोषून घेतं. यामुळे किरणं परत जात नाहीत आणि विमान शत्रूच्या रडारला दिसत नाही. याला गुळगुळीत आणि गोल आकार दिला जातो. यामुळे कमी रडार किरणं परावर्तित होतात. जर विमानात क्षेपणास्त्रे आणि शस्त्रे ठेवली तर ती कमी दृश्यमान होतील. यामुळे विमानाचा वेग देखील वाढतो.
याची किंमत किती?
हे लढाऊ विमान अमेरिकेने 1989 मध्ये बनवलं होतं. त्यावेळी त्याची किंमत सुमारे 737 दशलक्ष डॉलर्स होती. त्यावेळी ते जगातील सर्वात महागडे लढाऊ विमान होते. 1997 मध्ये त्यात काही बदल करण्यात आले. त्यामुळे त्याची एकूण किंमत सुमारे 2.1 अब्ज डॉलर्स झाली. आजच्या घडीला ते 4 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 350 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत आजही ते जगातील सर्वात महागडे लढाऊ विमान आहे.
एका तासासाठी ते उडवण्याचा खर्च 135000 डॉलर्स म्हणजे सुमारे 1.16 कोटी रुपये आहे. भारतात, बीएमडब्ल्यू कारच्या काही मॉडेल्सची किंमत एक कोटींपेक्षा जास्त आहे. दर सात वर्षांनी या विमानात 60 दशलक्ष डॉलर्सचे सुधारणा केले जातात.
