World War III : तिसरं महायुद्ध सुरू झालं? आपल्याला कसं समजणार? कशी होते याची घोषणा?

Last Updated:

Third War : जगात काही देशात युद्ध सुरू आहेत. युद्धाची ही परिस्थिती पाहता अनेकांना प्रश्न पडला आहे की तिसरं महायुद्ध सुरू झालं की काय? 

World War III : तिसरं महायुद्ध सुरू झालं? आपल्याला कसं समजणार? कशी होते याची घोषणा?
World War III : तिसरं महायुद्ध सुरू झालं? आपल्याला कसं समजणार? कशी होते याची घोषणा?
नवी दिल्ली : एकीकडे रशिया-युक्रेन, तर दुसरीकडे इस्रायल आणि इराण, या देशांमध्ये युद्ध सुरू आहेत. त्यात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. युद्धाची परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. युद्ध काही थांबण्याची चिन्हं नाहीत. अशा परिस्थितीत सामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न सतत आहे की, तिसरं महायुद्ध सुरू झालं आहे का? याची काही अधिकृत घोषणा झाली आहे का? आणि जर झाली तर आपल्याला कसं कळेल?
महायुद्ध म्हणजे असं युद्ध ज्यामध्ये जगातील अनेक प्रमुख देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असतात. पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 आणि दुसरं महायुद्ध 1939 ते 1945. दोन्ही युद्धे एकाच घटनेनं सुरू झाली, परंतु हळूहळू संपूर्ण जगाला वेढून टाकलं.
आजच्या जगात, युद्ध सायबर हल्ले, आर्थिक निर्बंध, दहशतवादी हल्ले आणि तांत्रिक शस्त्रे वापरून गुप्तपणे लढले जातं. म्हणून, ते अचानक सुरू होऊ शकतं आणि कधीकधी लोकांना महिन्यांनंतर कळतं की ते युद्धाच्या स्थितीत राहत होते. आताची युद्ध पाहता तिसरं महायुद्ध सुरू झालं की काय असं वाटू लागलं आहे.
advertisement
आता तिसरं महायुद्ध सुरू?
सध्या जग अनेक आघाड्यांवर युद्धसदृश परिस्थितीचा सामना करत आहे. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेलं युद्ध, तैवानवर चीनची नजर, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या आणि इस्रायल आणि इराणमधील तणाव या सर्वांमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलं आहे. फरक एवढाच आहे की यावेळी युद्ध केवळ शस्त्रांनी लढलं जाणार नाही, तर डेटा, अवकाश, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातूनही लढलं जाईल.
advertisement
तिसऱ्या महायुद्धाची घोषणा कधी?
आता तिसरं महायुद्ध सुरू झालं असेल तरी याची अधिकृत घोषणा कोण आणि कुठून करेल असा प्रश्न आहेच. तर तिसऱ्या महायुद्धाची घंटा वाजणार नाही आणि कोणताही नेता त्याची घोषणा करणार नाही. पण जेव्हा एकाच वेळी अनेक आघाड्यांवर गोळ्या सुरू होतात, जेव्हा जगातील देश एकमेकांवर निर्बंध लादण्यास सुरुवात करतात आणि जेव्हा तुम्ही सामान्य जीवनातून थेट आपत्कालीन परिस्थितीत जाता तेव्हा समजून घ्या की तिसरं महायुद्ध सुरू झालं आहे.
advertisement
तिसरं महायुद्धाची चिन्हे काय?
तिसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला रशिया विरुद्ध नाटो, चीन विरुद्ध तैवान, इराण विरुद्ध इस्रायल अशा अनेक देशांमध्ये एकाच वेळी युद्धं सुरू होतील.
जर नाटो, क्वाड, एससीओ किंवा इतर प्रमुख लष्करी युती सक्रियपणे युद्धात उतरल्या, जर कोणत्याही देशाने अणुहल्ला केला तर हे युद्धाचं टोकाचं लक्षण असेल.
advertisement
बँकिंग प्रणाली, एअरपोर्ट, उपग्रह आणि पॉवर ग्रिडवर सायबर हल्ले वाढतील.
जागतिक व्यापार थांबतील.
पेट्रोलियम किंवा धान्य यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडतील.
view comments
मराठी बातम्या/Viral/
World War III : तिसरं महायुद्ध सुरू झालं? आपल्याला कसं समजणार? कशी होते याची घोषणा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement