Donald Trump On Iran : 'आता इराणने यापुढे....' आण्विक तळावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांची धमकी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Donald Trump On Iran : डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित करताना इराणला धमकी दिली आहे.
नवी दिल्ली: इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळा हल्ले केले. आण्विक तळ उद्धवस्त केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दिली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित करताना इराणला धमकी दिली आहे.
इराणवरील हवाई हल्ल्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेचे उद्दिष्ट इराणची आण्विक कार्यक्रम क्षमता नष्ट करणे आणि त्याचा अणुधोका कायमचा नष्ट करणे आहे. इराण गेल्या 40 वर्षांपासून अमेरिकेविरुद्ध काम करत आहे आणि अनेक अमेरिकन लोक या द्वेषाचे बळी पडले आहेत, म्हणून मी ठरवले आहे की हे सर्व आता सुरू राहणार नाही.
advertisement
इराणमध्ये आता शांतता नाहीतर.... ट्रम्प यांची धमकी
ट्रम्प यांनी इराणला शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू आणि इस्रायली सैन्याचे अभिनंदन केले. त्यांनी इशारा दिला की जर इराणने अजूनही शांतता स्वीकारली नाही तर भविष्यातील हल्ले आणखी भयानक असतील. इराणमध्ये शांतता असेल किंवा विनाश असेल, असा गंभीर इशारादेखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
advertisement
अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन, इराणचा आरोप
इराणच्या अणुऊर्जा संघटनेने अमेरिकेच्या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. संघटनेने स्पष्ट केले की ते त्यांच्या 'राष्ट्रीय उद्योगाचा' विकास कोणत्याही किंमतीत थांबू देणार नाही आणि इराणची अणु प्रगती सर्व परिस्थितीत सुरू राहील असेही इराणने म्हटले.
इराणची अमेरिकेला धमकी...
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणही चांगलाच खवळला आहे. सुरुवात तुम्ही केलीय आणि आता शेवट आम्ही करणार असल्याचे इराणने अमेरिकेला ठणकावले आहे. इराणच्या इशाऱ्यानंतर आता अमेरिकाही अलर्ट मोडवर आली आहे. आखाती देशातील लष्करी तळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. इराकमधील दूतावासातील कर्मचाऱ्यांना देशाबाहेर काढण्यात येत आहे.
advertisement
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही उघड धमकी दिली आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आता या प्रदेशात उपस्थित असलेला प्रत्येक अमेरिकन नागरी आणि लष्करी कर्मचारी आमच्यासाठी लक्ष्य आहे. ट्रम्प यांना थेट उद्देशून इराणने म्हटले की सुरुवात तुम्ही केली आणि शेवट आम्ही करणार आहोत. इराणच्या या तीव्र प्रतिक्रियेमुळे इराणी सैन्य अमेरिकेवर लवकरच पलटवार करणार असल्याचे म्हटले जात आहे.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
June 22, 2025 8:42 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump On Iran : 'आता इराणने यापुढे....' आण्विक तळावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांची धमकी