अमेरिका हा जगाच्या पाठीवरचा एक असा देश आहे, ज्याच्याबद्दल जगातल्या सगळ्या वयाच्या नागरिकांना कुतूहल आहे. तिथली शहरं, तिथलं राजकारण, समाजकारण, तिथलं जीवनमान अशा सगळ्या गोष्टींबद्दल तिथे जाऊन आलेल्या किंवा तिथे स्थायिक झालेल्यामध्ये कौतुक ओसंडत असतं. आपण एकदा तरी अमेरिका पाहावी असंही कित्येकांचं स्वप्न असतं. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, मॅनहॅटन, लॉस एंजलीस अशी शहरं जगातली प्रगत शहरं म्हणून ओळखली जातात. न्यूयॉर्क हे फक्त प्रगत नाही, तर श्रीमंत शहरही आहे. खरं तर नुसतं श्रीमंत असं त्याचं वर्णन करणं त्या श्रीमंतीला पुरेसं न्याय देणारं नाही.
advertisement
(Israel Embassy : दिल्लीत इज्रायल एम्बसीजवळ स्फोट, घटनास्थळावर सापडलेल्या पत्रामुळे खळबळ)
न्यूयॉर्क नावाच्या या छोट्याशा शहरात 100/200 किंवा 300 नाही, तर लाखो करोडपती राहतात. त्यामुळेच जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर असा या शहराचा लौकिक आहे. फोर्ब्जने हेन्ली आणि पार्टनर्सच्या एका रिपोर्टनुसार सांगितलेली माहिती रंजक आहे. फोर्ब्ज सांगतं, की न्यूयॉर्कमध्ये 3 लाख 40 हजार कोट्यधीश राहतात. एकाच शहरात राहणाऱ्या कोट्यधीशांच्या निकषावर विचार केला, तर न्यूयॉर्कमध्ये जगातले सगळ्यात जास्त कोट्यधीश राहतात. त्या खालोखाल 724 सेंटिमिलियनेअर्स आणि 58 बिलियनेअर्सही या शहरात राहतात. त्यामुळे न्यूयॉर्क हे सर्वार्थाने श्रीमंतांचं शहर आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज आणि नॅसडॅक या दोन जगातल्या सर्वांत मोठ्या स्टॉक एक्स्चेंजेसचं माहेरघरही न्यूयॉर्क आहे यात आश्चर्य वाटावं असं काही नाही.
न्यूयॉर्कची लोकसंख्या 85 लाख एवढी आहे. त्यापैकी सुमारे तीन लाख जण कोट्यधीश आहेत. सिंगापूर, लॅास एंजलीस, हाँगकाँग, बीजिंग, शांघाय, सिडनी या शहरांमध्येही जगातल्या श्रीमंत नागरिकांचा मुक्काम आहे. अमेरिका तुमच्या प्रवासाच्या बकेट लिस्टमध्ये असेल तर श्रीमंतांच्या या शहरालाही नक्की भेट द्या!
