TRENDING:

फ्लाइटमधील हेडफोनसह 'या' वस्तू घेऊन जाऊ शकता घरी, कोणी काही बोलणार नाही, विमान प्रवासाचे हे नियम जाणून घ्या

Last Updated:

तुम्हाला माहीत आहे का, की काही वस्तू अशा आहेत ज्या प्रवासानंतर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता? चला त्या वस्तू कोणत्या आहेत जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विमानप्रवास करताना सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम पाळावे लागतात. काही वस्तू अशा असतात ज्या विमानात नेण्यास परवानगीच नसते, कारण त्यांच्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. तर काही वस्तू विमान कंपनीकडून प्रवाशांच्या सोयीसाठी दिल्या जातात. साधारणपणे प्रवासादरम्यान वापरायच्या या वस्तू परत विमानातच ठेवाव्या लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की काही वस्तू अशा आहेत ज्या प्रवासानंतर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता? चला त्या वस्तू कोणत्या आहेत जाणून घेऊ.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

हेडफोन

घरेलू फ्लाइटमध्ये अनेकदा प्रवाशांना सिंगल-यूज हेडफोन किंवा इअरबड्स दिले जातात. प्रवासानंतरही तुम्ही ते घरी घेऊन जाऊ शकता. यावर एअरहोस्टेस काही आक्षेप घेत नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात जे इन-बिल्ट हेडफोन दिले जातात, ते मात्र विमानातच ठेवावे लागतात.

ब्लॅंकेट आणि उशा

आंतरराष्ट्रीय विमानप्रवासात काही एअरलाइन्स प्रवाशांना पॅक केलेले ब्लॅंकेट आणि उशा देतात. अशावेळी ते तुमचेच समजले जातात आणि तुम्ही ते घरी घेऊन जाऊ शकता. मात्र, अनपॅक ब्लॅंकेट किंवा उशा विमानाचीच मालमत्ता मानली जाते. त्यामुळे ती विमानातच ठेवावी लागतात.

advertisement

स्लीप मास्क, मोजे आणि टूथब्रश किट

लांबच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना स्लीप मास्क, मोजे आणि टूथब्रश किट दिली जातात. ही वस्तू डिस्पोजेबल असतात, त्यामुळे एअरहोस्टेस ती परत घेत नाही. त्यामुळे प्रवासानंतरही तुम्ही ती वस्तू वापरू शकता.

स्नॅक्स आणि चॉकलेट्स

प्रवासादरम्यान दिले जाणारे बिस्किट, चॉकलेट, ड्रायफ्रूट्स किंवा स्नॅक्स जर तुम्ही खाल्ले नाहीत, तर ते तुम्ही निःसंकोचपणे सोबत घेऊन जाऊ शकता. कारण हे पदार्थ तिकिटाच्या किंमतीतच समाविष्ट असतात.

advertisement

मासिके आणि मेनू कार्ड

प्रवासादरम्यान काही विमानात स्क्रीन उपलब्ध नसतात. अशावेळी प्रवाशांना मासिके वाचण्यासाठी दिली जातात. तुम्ही ती वाचून नंतर घरी नेऊ शकता. याशिवाय, प्रीमियम किंवा बिझनेस क्लास प्रवाशांना दिले जाणारे मेनू कार्ड देखील तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता.

कोणत्या वस्तू नेता येत नाहीत?

एअरहोस्टेस सुरुवातीला प्रवाशांना सुरक्षा उपाय सांगतात आणि आपत्कालीन सुरक्षा किट कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक दाखवतात. हे साहित्य पूर्णपणे विमानाची मालमत्ता असते. त्यामुळे ते घरी नेता येत नाही. तसेच सुरक्षा सूचना कार्ड देखील सीटवरच ठेवावे लागते.

advertisement

म्हणजेच, विमानप्रवास संपल्यानंतर काही वस्तू तुम्ही घरी नेऊ शकता, तर काही वस्तू विमानातच ठेवाव्या लागतात. प्रवाशांनी हे नियम पाळणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या/Viral/
फ्लाइटमधील हेडफोनसह 'या' वस्तू घेऊन जाऊ शकता घरी, कोणी काही बोलणार नाही, विमान प्रवासाचे हे नियम जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल