गुळाचे खरे फायदे
स्त्रीरोग तज्ज्ञ आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. गौरी राय यांच्या मते, हिवाळ्यात गर्भवती महिलांनी गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. गुळामध्ये आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. हे घटक आई आणि बाळ दोघांसाठीही महत्त्वाचे आहेत.
गर्भधारणेदरम्यान पाय सुजणे, सर्दी-खोकला आणि रक्ताची कमतरता (ऍनिमिया) ही समस्या अनेक महिलांना भेडसावते. गुळाचे सेवन केल्याने या तक्रारी कमी होऊ शकतात. तसेच गुळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
advertisement
बाळाच्या हाडांसाठी फायदेशीर
तज्ज्ञांच्या मते, गुळ बाळाच्या हाडांना मजबूत बनवतो आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. गुळ तुम्ही जेवणानंतर गोड म्हणून खाऊ शकता किंवा चहामध्ये साखरेऐवजी वापरू शकता.
गर्भपात होतो हा केवळ गैरसमज
डॉ. अदिती घई सांगतात की, अनेक महिला गुळ खाल्ल्याने गर्भपात होतो असे मानतात कारण गुळ हा गरम आहे. परंतु हे केवळ एक मिथक आहे. योग्य प्रमाणात गुळ खाणे सुरक्षित आहे आणि गर्भपाताशी याचा काहीही संबंध नाही.
प्रेग्नन्सीमध्ये गुळ खाणे हानिकारक नाही, उलट योग्य प्रमाणात सेवन केल्यास आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात बदल करावा.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
