समाज काय म्हणेल याची पर्वा न करता या जोडप्याने आपलं नातं पुढे नेलं आहे. व्हिडिओमध्ये हा तरुण आपल्या प्रेयसीचा हात हातात धरून दिसतो, तर आजी तिच्या स्टायलिश लुक आणि गोड आवाजाने सर्वांचं मन जिंकते. याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही कुटुंबांनीही या नात्याला मान्यता दिली आहे. लोक या अनोख्या जोडप्याचं कौतुक करत असून, याला खऱ्या प्रेमाचं उदाहरण म्हणत आहेत.
advertisement
कशी झाली ओळख?
हा युगुल रस्त्यावर इंटरव्ह्यू देताना दिसला आणि तेव्हापासून ते चर्चेत आले. तरुण कोफू आपल्या प्रेयसी आयकोचा हात धरून दिसला. आयकोचे सजवलेले नख, लहान केसांचा फॅशनेबल हेअरकट आणि मधुर आवाजामुळे त्या वयापेक्षा खूप तरुण दिसत होत्या. त्यांना एकत्र पाहून अनेकजण थक्क झाले.
व्हॅलेंटाईन डेवर सुरू झालं प्रेम
आयकोने सांगितलं की त्यांची प्रेमकहाणी व्हॅलेंटाईन डेपासून सुरू झाली. सहा महिन्यांहून अधिक काळ दोघं एकत्र आहेत. त्यांचं नातं फक्त आकर्षणावर नाही, तर खोल समज आणि आत्मीयतेवर आधारलेलं आहे. म्हणूनच सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे.
ऑनलाइन पोर्टल 8Days नुसार, आयको याआधी हॉर्टिकल्चरिस्ट म्हणून काम करीत होत्या आणि त्यांच्याकडे मोठं बोटॅनिकल गार्डन होतं. त्या दोनदा लग्न करून विभक्त झाल्या आहेत. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आणि पाच नातवंडं आहेत. सध्या त्या मुलाच्या कुटुंबासोबत राहतात. आश्चर्य म्हणजे, कुटुंबानेही या अनोख्या नात्याला मनापासून स्वीकारलं आहे.