TRENDING:

जावेद हबीब यांनी सांगितली केस धुण्याची योग्य पद्धत; कधीच होणार नाही कोंडा आणि केस गळती

Last Updated:

प्रसिद्ध हेअर एक्स्पर्ट जावेद हबीब यांच्या मते, केसांना योग्य काळजी घेतल्यास ते केवळ निरोगीच राहतात असे नाही तर वय वाढल्यानंतरही त्यांची चमक आणि मजबुती टिकून राहते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्यापैकी अनेकांना केसांच्या समस्या भेडसावत असतात फ्रीज केस, कोंडा, केस गळणे किंवा स्प्लिट हेअर्स. यामुळे केस झाडूसारखे दिसतात आणि व्यक्तिमत्वावरही त्याचा परिणाम होतो. पण, जर केसांची योग्य पद्धतीने निगा राखली तर अनेक समस्या सहज टाळता येतात. प्रसिद्ध हेअर एक्स्पर्ट जावेद हबीब यांच्या मते, केसांना योग्य काळजी घेतल्यास ते केवळ निरोगीच राहतात असे नाही तर वय वाढल्यानंतरही त्यांची चमक आणि मजबुती टिकून राहते.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

केस धुण्याची योग्य पद्धत

जावेद हबीब सांगतात की, केस धुण्यापूर्वी 5-10 मिनिटे गार किंवा कोमट पाण्यात किंचित ओलसर केलेल्या केसांवर मोहरीचे तेल लावा. त्यानंतर शॅम्पू, साबण किंवा रीठ्याच्या सहाय्याने केस चांगले धुवा. या प्रक्रियेमुळे केस स्वच्छ राहतात आणि त्यांच्या मुळांना पोषण मिळते.

रोज केस धु्याचे फायदे

अनेकांना वाटते की, वारंवार केस धुतल्याने ते गळतात, पण जावेद हबीब यांचे म्हणणे याउलट आहे. दररोज केस धुतल्याने स्प्लिट हेअर्स होण्याची शक्यता कमी होते, केस गळती नियंत्रित राहते, आणि 50 वर्षांनंतरही केस गळणे तुलनेने कमी होते.

advertisement

जावेद हबीब यांच्या मते, मोहरीच्या तेलात आवश्यक खनिजे, फॅटी अ‍ॅसिडस् आणि जीवनसत्त्वे आढळतात, जे केसांना हायड्रेट आणि कंडिशन करतात. त्यामुळे केस नैसर्गिकरीत्या मऊ, चमकदार आणि पोषणयुक्त राहतात.

उत्तर भारतातील केसांच्या समस्या

हबीब सांगतात की, उत्तर भारतातील लोकांना घाम जास्त येतो, त्यामुळे त्यांना कोंड्याची समस्या अधिक भेडसावते. कोंडा हा केसांसाठी विषासारखा असतो. त्यामुळे अशा हवामानात राहणाऱ्यांनी रोज केस धुतले पाहिजेत, यामुळे केसांना मोठा फायदा होतो.

advertisement

लांब केसांसाठी योग्य सवयी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर पुन्हा गडगडले, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

काही लोकांना लांब केस हवे असतात, पण त्यांच्यामध्ये असा समज असतो की, वारंवार केस धुतल्याने ते गळतात. प्रत्यक्षात तसे नाही. दररोज केस धुतल्याने केस गळत नाहीत, उलट त्यांची वाढ चांगली होते आणि केसांची आरोग्यस्थिती सुधारते.

मराठी बातम्या/Viral/
जावेद हबीब यांनी सांगितली केस धुण्याची योग्य पद्धत; कधीच होणार नाही कोंडा आणि केस गळती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल