पण त्यांनी की रक्कम जिंकल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थीत झाले. त्यांपैकी एक प्रश्न असा की केबीसीमध्ये जर कोणी 1 कोटी जिंकले तर सगळी किंमत विजेत्याला मिळते का? किंवा त्यावर किती रुपयांचा टॅक्स लागतो?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण पूर्ण एक कोटी रुपये विजेताच्या बॅक खात्यात कधीच येत नाहीत. भारतात गेम शो, लॉटरी, रेस, क्रॉसवर्ड, गॅम्बलिंग इत्यादींमधून मिळणाऱ्या जिंकलेल्या रकमेवर Flat Tax (सरल कर) लागू केला जातो हा दर 30% आहे, त्यात Cess (4%) आणि आवश्यक असल्यास Surcharge देखील लागू होतो
advertisement
TDS (Tax Deducted at Source) पण लागू केला जातो. ही रक्कम जिंकणार्याला देण्यापूर्वीच वजा केली जाते. कारण Income Tax Act (अनुच्छेद 115BB) च्या अंतर्गत हे उत्पन्न "Income from Other Sources" म्हणून वर्गीकृत असून, त्यावर कोणतीही सवलत उपलब्ध नाही.
मग 1 कोटीवर किती रक्कम बँकेत येईल?
चला, थेट गणना करूया:
मूळ रक्कम = ₹1,00,00,000 (1 कोटी)
Flat Tax (30%) = ₹30,00,000
Cess (4% of ₹30,00,000) = ₹1,20,000
एकूण कर = ₹31,20,000
रक्कम (Take-home) = ₹1,00,00,000 − ₹31,20,000 = ₹68,80,000
या गणनेत Surcharge समावेश केलेला नाही; कारण तो १ कोटीच्या वर लागू होतो. या उदाहरणानुसार, आदित्य कुमार यांच्या खात्यात अंदाजे ₹68.8 लाख इतकी रक्कम जमा होईल.
खरंतर कराची किंमत इतकी जास्त आहे ज्या किंमतीत मुंबईच्या बाहेर किंवा इतर राज्यांमध्ये तुम्ही एखादं 1bhk घेऊ शकता. ही रक्कम खरंतर आश्चर्यचकीत करणारी आहे. पण हे खरं आहे.
