बिहारमधील एका छोट्या गावातून आलेले मिथिलेश साधारण कुटुंबातून आहेत, लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांना सामान्य ज्ञानाची विशेष आवड होती आणि गावातील शाळेत शिकत असतानाच त्यांनी ठरवलं होतं की, एक दिवस ते केबीसीच्या हॉट सीटवर बसणारच. त्यांचं स्वप्न डिएसपी बनण्याचे होतं, मात्र तीन वेळा हाइटच्या निकषामुळे त्यांना या परीक्षेतून बाहेर व्हावं लागलं. शोदरम्यान त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या उंचीचं कौतुकही केलं.
advertisement
25 ऑगस्टच्या भागात स्पर्धक दीपक 25 लाखांच्या प्रश्नावरून बाहेर पडले होते. तर 26 ऑगस्टच्या भागात मिथिलेश कुमार यांनी हॉट सीटवर बसताच बिग बीचं मन जिंकून घेतलं. पहिल्या प्रश्नापासून ते चौदाव्या प्रश्नापर्यंत त्यांनी आत्मविश्वासाने खेळ खेळला आणि 25 लाखांच्या प्रश्नावर पोहोचल्यावरही ते अजिबात घाबरले नाहीत आणि ऑडियन्स पॉल ही लाईफलाइन वापरली.
त्यावेळी 25 लाखांसाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की कोणत्या देशाने आपल्या नागरिकांना ब्रॉडबँड इंटरनेटचा कायदेशीर अधिकार दिला?
पर्याय:
A. फिनलंड
B. कॅनडा
C. न्यूझीलंड
D. जर्मनी
मिथिलेश यांनी योग्य उत्तर फिनलंड देत 25 लाख रुपये जिंकले. ही रक्कम जिंकल्यानंतर त्यांनी सांगितले की, ते आपल्या भावासाठी या वेळेस वाढदिवसानिमित्त सायकल घेणार आहेत. कारण आतापर्यंत त्यांच्याकडे कधीच वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नव्हते.
अमिताभ यांनी खेळ पुढे नेला. मिथिलेश कुमार यांना त्यांनी 50 लाख रुपयांसाठी एक प्रश्न विचारला, जो दिल्लीच्या लाल किल्ल्याशी संबंधित होता. मिथिलेश यांना उत्तर माहीत होतं, पण एक छोटीशी चूक झाली. प्रश्न असा होता की, दिल्लीच्या लाल किल्ल्याचे डिझाईन करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते, त्या वास्तुकाराच्या नावात कोणत्या शहराचं नाव येतं?
मिथिलेश कुमार यांना आपल्या उत्तरावर पूर्ण विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी '50-50' लाइफलाइनचा वापर केला. पण तरीही ते गोंधळात होती, अशावेळी त्यांनी धोका न घेता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, 'कौन बनेगा करोडपती 17' चा खेळ सोडण्यापूर्वी मिथिलेश यांनी पर्याय C) लाहोर निवडला आणि तेच योग्य उत्तर ठरलं. होस्ट अमिताभ बच्चनसह सगळेच आश्चर्यचकित झाले. शेवटी मिथिलेश यांनी 25 लाख रुपये जिंकून घरी नेले.