TRENDING:

Khan Sir Hospital: खान सरांच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड, एका रात्रीत काढून टाकले महागडे टाइल्स, कारण कळालं तर तुम्ही म्हणाल, 'असं पण असतं का?'

Last Updated:

त्यांच्या हॉस्पिटलचं बांधकाम कार्य वेगाने सुरू असताना एक अनपेक्षित घटना घडली, ज्याने स्वयं खान सरसुद्धा चकित झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पटना येथील प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबवर प्रसिध्द खान सर वैद्यकीय क्षेत्रात देखील सक्रिय झाले आहेत. ते एक मोठे हॉस्पिटल उभारत आहेत जिथे रुग्णांना सरकारी हॉस्पिटलपेक्षा स्वस्त आणि दर्जेदार उपचार मिळू शकतील. त्याचबरोबर, त्यांनी ब्लड बँक, डायलिसिस सेंटर आणि कॅन्सर हॉस्पिटल यांसारख्या अत्यावश्यक सुविधा त्यात पुरवण्याची घोषणा केली आहे. नुकतेच त्यांनी अनेक डायलिसिस मशीनसह केलेला एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता.
खान सरांच्या हॉस्पिटलमध्ये ओटीचे टाईल्स तोडले
खान सरांच्या हॉस्पिटलमध्ये ओटीचे टाईल्स तोडले
advertisement

पण त्यांच्या या हॉस्पिटलचं बांधकाम कार्य वेगाने सुरू असताना एक अनपेक्षित घटना घडली, ज्याने स्वयं खान सरसुद्धा चकित झाले. त्यांनी ऑपरेशन थिएटरच्या फ्लोरिंगसाठी अतिशय महागड्या, चमकदार, मार्बलसारख्या टाईल्स लावल्या होत्या. मात्र इन्स्पेक्शन दरम्यान अधिकाऱ्यांनी या टाईल्स लगेच काढून टाकण्यास सांगितले.

खान सर म्हणतात, ऑपरेशन थिएटरमध्ये टाईल्स न लावण्याचे कारण अत्यंत गंभीर आहे. टाईल्स एकत्र जोडल्यावर जॉइंट्स निर्माण होतात, जिथे बॅक्टेरिया, व्हायरस व बुरशी जमा होण्याची शक्यता असते—अतिशय सूक्ष्म प्रमाणात, जिथे एका मस्टर्ड दाण्याच्या आत हजारो सूक्ष्मजंतू बसू शकतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही जॉइंट्स शिवाय या खोलीचे फ्लोरिंग हवे होते.

advertisement

टाईल्स काढून टाकल्यानंतर त्यांच्या ऐवजी त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये विशेष ओटी मॅट लावला. जो कोणत्याही जॉइंटशिवाय एकसंध आहे. त्याचाच एक भाग दिसायला मार्बलसारखा असला तरी, तो अवघ्या ओटी साठी बनवलेला सुरक्षित आणि स्वच्छ मॅट आहे.

एक आणि थोडा वेगळा नियम त्यांना आपल्या रुग्णालयाती रुग्णांबाबत लावण्याचा विचार केला. खान सर म्हणाले, रुग्णांना 'पेशंट' किंवा 'केस' म्हणण्याऐवजी 'गेस्ट' म्हणजेच 'पाहूणे' म्हणून संबोधले जाईल. कारण, आजारी व्यक्ती अगोदरच वेदनेत आहे, त्यात त्यांना 'रुग्ण' म्हणून संबोधल्यास त्याचा आत्मविश्वास घसरतो. म्हणून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रेमाने आणि आदराने 'मेहमान' म्हणून स्वागत केलं जाईल.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Khan Sir Hospital: खान सरांच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड, एका रात्रीत काढून टाकले महागडे टाइल्स, कारण कळालं तर तुम्ही म्हणाल, 'असं पण असतं का?'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल