भाज्या चिरणं हे अनेकांसाठी कंटाळवाणं काम. कित्येक महिला तर भाज्या चिरण्यासाठी घरी बाई ठेवतात किंवा बाजारातूनच चिरलेल्या भाज्या आणतात. पण आता भाज्या चिरणं सोपं झालं आहे. सुरी-चाकूशिवायही तुम्ही भाजी चिरू शकता तेसुद्धा फक्त प्लॅस्टिक बाटली. आता प्लॅस्टिक बाटलीने भाजी कशी चिरायची असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
Kitchen Jugaad Video : चपातीच्या पिठात नाणं टाकताच झाली कमाल, चुटकीत झालं मोठं काम
advertisement
प्लॅस्टिक बाटलीने भाजी कशी कापायची याचा व्हिडीओ Mummy ki useful tips या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत दाखवल्यानुसार प्लॅस्टिक बाटली मधून कापा त्याचा खालील भाग कापून टाका. आता ब्लेट घ्या आणि तो चिकटपट्टीने बाटलीच्या कापलेल्या भागाच्या समोरच्या भागावर चिकटवा. काय आणि कसं करायचं हे तुम्ही व्हिडीओ पाहिलं की तुम्हाला समजेल.
आता बाटलीचा झाकणाकडील भाग हातात धरून तुम्ही झटपट भाज्या चिरू शकता. जसं या व्हिडीओत महिलेनं दाखवलं आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Kitchen Jugaad Video : कांदा वापरा पण पेपरचे तुकडे टाकूनच, पावसात मोठा फायदा
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. कोणत्याही नुकसानीसाठी न्यूज18मराठी जबाबदार नाही.)