Kitchen Jugaad Video : चपातीच्या पिठात नाणं टाकताच झाली कमाल, चुटकीत झालं मोठं काम
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Tips In Marathi : चपातीच्या पिठात नाणं टाकण्याचा मोठा फायदा आहे. असा की तुम्ही विचारही केला नसेल. यामुळे तुमचं मोठं काम अगदी सोपं आणि चुटकीत होईल. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड शेअर केला आहे.
नवी दिल्ली : चपाती बनवण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतो. त्यात मीठ, पाणी टाकून, तेल लावून ते मळून घेतो. पण तुम्ही कधी चपातीच्या पिठात नाणी टाकून पाहिली आहेत का? चपातीच्या पिठात नाणं टाकण्याचा मोठा फायदा आहे. असा की तुम्ही विचारही केला नसेल. यामुळे तुमचं मोठं काम अगदी सोपं आणि चुटकीत होईल. एका गृहिणीने हा जबरदस्त असाकिचन जुगाड शेअर केला आहे.
चपातीसाठी आपण गव्हाचं पीठ घेतल्यानंतर ते सर्वात आधी चाळून घेतो. पण बऱ्याचदा असं होतं की पीठ चाळताना ज्या भांड्यात ते चाळतो ते लहान असतं. त्यामुळे किंवा पीठ चाळणीतून उडाल्याने ते बाहेर पडतं आणि पीठ चाळायलाही खूप वेळ जातो. आता इथंच तुम्हाला नाण्याचा वापर करायचा आहे. ते कसं ते पाहुयात.
advertisement
काही नाणी घ्या. ही नाणी तुम्हाला धुवून घ्यायची आहेत. कारण ती बऱ्याच लोकांनी हाताळलेली असतात आणि आपण ज्यापासून चपाती बनवणार त्या पिठात टाकणार आहेत. स्वच्छ धुतलेली नाणी व्हिडीओत महिलेने दाखवल्यानुसार पीठ चाळताना चाळणीतील पिठात तुम्हाला टाकायची आहेत. आता चाळणीतून पीठ चाळून बघा. पीठ पटापट चाळलं जातं आणि ते चाळणीतून बाहेरही पडत नाही. काय मग आहे की नाही कमाल.
advertisement
Creator Search 2.0 युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
Jul 08, 2025 3:07 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : चपातीच्या पिठात नाणं टाकताच झाली कमाल, चुटकीत झालं मोठं काम









