प्लॅस्टिक बाटलीचा अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत दाखवल्यानुसार प्लॅस्टिक बाटली घ्यायची. त्यावरील लेबल काढून टाकायचं. एक लांब पाइप, काठी किंवा दांडा घ्या. हा पाईप बाटलीत जाईल असा होल बाटलीच्या मधोमध पाडा. त्यात पाईप घुसवा. बाटली हलणार नाही अशा पद्धतीने ती पाइपवर घट्ट बसवा. एक जुना टीशर्ट पाण्यात भिजवून घ्या आणि तो त्या पाइपला लावलेल्या बाटलीला गुंडाळा.
advertisement
Kitchen Jugaad Video : सिलेंडर रिकामा होताच त्यावर मिक्सरचं भांडं ठेवा, मोठा फायदा
आता याचा फायदा काय? तर हा तुमचा होममेड क्लीनर वाइप तयार झाला. हा तुम्ही जमिनीवर फिरवला की जमीन आणि भिंतीवर फिरवला की भिंत स्वच्छ होईल. उंचावर असलेल्या वस्तूही तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करू शकता. तुम्हाला हात लावून किंवा खाली वाकून स्वच्छता करायची गरज नाही. अगदी काही तासात फार मेहनत न घेता तुम्ही घर स्वच्छ करू शकता.
Ayeshas kitchen hack यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये ठेवा पैसे, तासभराने उघडताच कमाल दिसेल
तुम्हाला हा जुगाड कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे असे काही किचन जुगाड असतील तर तेसुद्धा आमच्यासोबत नक्की शेअर करा.