आतापर्यंत आपण चमच्याने खाल्लं आहे, खाद्यपदार्थ ढवळण्यासाठी आपण चमच्याचा वापर करतो. पण याच चमच्याने माठातील पाणी थंड होऊ शकतं, असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. किंबहुना विश्वास बसणार नाही. पण आता चमच्याचा वापर तुम्ही माठातील फ्रिज थंड करण्यासाठी करू शकता. माठातील पाणी फ्रिजसारखं गार करण्याचा एक उपाय सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
Kitchen Jugaad Video : उन्हाळ्यात AC वापरताय, रिमोटला चपातीचं पीठ नक्की लावा
आता हे कसं करायचं ते पाहुया. एक ग्लास घ्या. त्यात एक चमचा व्हिनेगर, एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा मीठ टाकून मिश्रण करा. या पाण्याने माठ आतून घासून घ्या. दोनदा धुवून घ्या. आता यात पाणी भरून ठेवा. पाहा कसं फ्रिजसारखं थंड पाणी तुम्हाला मिळेल.
आता हे कसं शक्य झालं, तर माठात छोटे छिद्र असतात जे बंद झालेलं असतात. या मिश्रणाने माठ घासल्याने हे छिद्रं खुले होता. यामुळे माठातील पाणी फ्रिजपेक्षाही 4 पट थंड होईल, असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.
Kitchen Jugaad : कपाळावरील टिकली घरातील टॉयलेटला लावून पाहा, मोठ्या समस्येतून होईल सुटका
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.)