Kitchen Jugaad Video : उन्हाळ्यात AC वापरताय, रिमोटला चपातीचं पीठ नक्की लावा

Last Updated:

Kitchen tips in marathi : एका गृहिणीने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ. ज्यात तिने एसीच्या रिमोटवर चपातीचं पीठ फिरवण्याचा सल्ला दिला आहे.

News18
News18
मुंबई : उन्हाळा म्हटलं की एसी आलाच. तुम्हीही तुमच्या घरात, ऑफिसमध्ये एसी लावला असेल. पण एसीची काळजी घ्यायला हवी. एसीसोबतच त्याच्या रिमोटचीही. यासाठी एसीच्या रिमोट चपातीचं पीठ एकदा नक्की लावून पाहा. एका गृहिणीने ही खास टिप दिली आहे. या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
आपल्या आजी-आईसारख्या कित्येक गृहिणी काही ना काही घरगुती जुगाड करत असतात. अशाच काही गृहिणी या जुगाडाचे व्हिडीओ सोशल मीडियावरही पोस्ट करतात. अशाच एका गृहिणीने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ. ज्यात तिने एसीच्या रिमोटवर चपातीचं पीठ फिरवण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
आता एसीच्या रिमोटवर चपातीचं पीठ फिरवल्याने काय होईल, त्याचा काय फायदा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, महिला चपातीचं मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घेते आणि तो रिमोटवर फिरवते. संपूर्ण रिमोटवरून तो ती हा गोळा फिरवून घेते.
advertisement
महिलेने व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार यामुळे रिमोट स्वच्छ होतो.  हा रिमोट इथं, तिथं पडलेला असतो. कित्येकांचे हात त्याला लागलेले असतात. तुम्हीही तुमचा रिमोट पाहिला असेल तर त्यावर तुम्हाला डाग दिसतील. रिमोटला कव्हर जरी घातलेलं असेल तर त्यात थोडीतरी धूळ तुम्हाला दिसेल. रिमोट कितीही पुसून स्वच्छ केला तरी त्याच्या कोपऱ्यात, बटणांमध्ये साचलेली घाण मात्र जात नाही.  पण या उपायामुळे तुमच्या रिमोटचा प्रत्येक कोपरा स्वच्छ होईल. पीठ चिकट असल्याने रिमोटवरील सर्व धूळ त्याला चिकटून येईल.
advertisement
Shreya's creative corner यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा उपाय फक्त एसीच्या रिमोटपुरता नाही तर तुम्ही टीव्ही किंवा इतर उपकरणांच्या रिमोटवरही करू शकता. तुम्ही हा उपाय एकदा करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : उन्हाळ्यात AC वापरताय, रिमोटला चपातीचं पीठ नक्की लावा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement