TRENDING:

Kitchen Jugaad Video : श्रावण सुरू होण्याआधी गॅसवर ठेवा वेलची, श्रावणात होतील फायदे

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : श्रावण म्हटलं की गोडधोड आणि गोड पदार्थ म्हणजे वेलची आलीच. पण पदार्थात ही वेलची घालण्याआधी ती गॅसवर ठेवायला हवी. वेलचीच्या किचन जुगाडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : श्रावण म्हटलं की खीर, पुरणपोळी, मोदक असं काही ना काही गोडधोड आलंच. दररोज नाही पण किमान श्रावण सोमवारी तरी असा गोडाचा बेत असतो. गोड पदार्थ म्हटले की त्यात वेलची आलीच. पण पदार्थात ही वेलची घालण्याआधी ती गॅसवर ठेवायला हवी. वेलचीच्या किचन जुगाडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

वेलचीचा वापर आपण गोड पदार्थ, चहामध्ये करतो. याचा सुगंध येतो आणि त्यामुळे चवही छान लागते. पण वेलची वापरण्याआधी ती गॅसवर ठेवा असा सल्ला एका महिलेनं दिला आहे.  वेलची गॅसवर ठेवण्याचा हा जुगाड तिनं दाखवला आहे. महिलेने व्हिडीओत दाखवल्यानुसार गॅसवर जेवण बनवताना गॅस स्टोव्ह गरम असतो. त्यावेळी तिथं ही वेलची ठेवून द्या. काही वेळाने गॅसवरील वेलची बाजूला काढा.

advertisement

Kitchen Jugaad Video : गॅसवर शॅम्पू टाकताच जणू जादूच झाली, गॅस लवकर संपणारच नाही

गॅसवर वेलची ठेवण्याचा फायदा काय?

याचा फायदा काय, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तुम्ही पाहिलं असेल वेलची आणल्यानंतर ती फ्रेश असते, त्याचे दाणे कुरकुरीत असतात. पण काही दिवस ती तशीच ठेवली तर ती नरम पडते. त्याची पूडही नीट होत नाही. अशावेळी ती वेलची गॅसवर ठेवली तर थोडी गरम होऊन पुन्हा ताजी दिसेल. त्याचे दाणेही कुरकुरीत होतात.

advertisement

Avika Rawat Foods युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.

वेलची खाण्याचे फायदे काय?

तोंडाची दुर्गंधी : दातांमध्ये पोकळी निर्माण होणे आणि श्वासात दुर्गंधी येणे ही खूप कॉमन समस्या आहे. पण ही समस्या जितकी कॉमन वाटत असली तरी तितकीच त्रासदायक आहे. दुर्गंधी घालवण्यासाठी वेलची तुम्हाला मदत करू शकते. याचे कारण असे की, वेलची तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास आणि पोकळी रोखण्यास मदत करते.

advertisement

रक्तदाब नियंत्रण : वेलची रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वेलचीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

Kitchen Jugaad Video : कपड्यांचा सेफ्टी पिन भांड्यांसाठी मोठा कामाचा, असा वापर तुम्ही पाहिलाच नसाल

पचनाच्या समस्या : आजकालच्या जीवनशैलीत अपचन, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या असणे अगदी कॉमन आहे. ही समस्या दूर करण्यात वेलचीही चांगली भूमिका बजावू शकते.

advertisement

संसर्ग होत नाही : ऋतू बदलामुळे होणारे विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन, फूड पॉयझनिंग आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही तुम्ही वेलचीची मदत घेऊ शकता. याचे कारण असे की वेलचीमध्ये असलेले आवश्यक तेले आणि अर्क विविध प्रकारच्या जीवाणूंविरूद्ध लढण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

रक्तातील साखरेची पातळी : उंदरांवरील अभ्यासात असे दिसून आले आहे की, वेलची उच्च रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

उलट्या, अस्वस्थता : वेलचीचा उपयोग पचनशक्ती राखण्यासाठी तसेच अस्वस्थता, मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. वेलची इतर औषधी मसाल्यांमध्ये मिसळून देखील वापरले जाते.

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : श्रावण सुरू होण्याआधी गॅसवर ठेवा वेलची, श्रावणात होतील फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल