TRENDING:

Kitchen Jugaad Video : प्लॅस्टिक भांड्यांना होल, पावसाळ्यात प्रत्येकाने हे करायला हवं, मोठा फायदा

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : छोट्या छोट्या प्लॅस्टिक भांड्यांचा पावसात इतका मोठा फायदा आहे की तुम्ही विचारही केला नसेल. या प्लॅस्टिक भांड्यांचा पावसात अनोख्या अशा वापराचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या प्रत्येकाच्या घरात प्लॅस्टिक भांडी असतातच. एखादं फूड ऑर्डर केलं की त्याचे डबे, श्रीखंडाचे डबे, लोणच्याची बरणी असं काही ना काही छोटं प्लॅस्टिक कंटेनर असतंच. सामान्यपणे काही जण सुकं काहीतरी ठेवण्यासाठी याचा वापर करतात तर काही जण फेकून देतात. पण या कंटेनरचा पावसात इतका मोठा फायदा आहे की तुम्ही विचारही केला नसेल. या प्लॅस्टिक भांड्यांचा पावसात अनोख्या अशा वापराचाजुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

तसं तुम्ही प्लॅस्टिकची मोठी भांडी पावसाचं पाणी साठवण्यासाठी वापरत असाल. पण छोट्या छोट्या भांड्याचाही तुम्हाला पावसात वापर करता येऊ शकतो.  पावसात बऱ्याच समस्या असतात. यापैकी तुमची एक समस्या घरातील याच छोट्या प्लॅस्टिक भांड्यामुळेच दूर होईल. प्लॅस्टिक भांडी इतकी कामाची असू शकतात, असंच तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल. यासाठी तुम्हाला फक्त भांड्यांना भोकं पाडायची आहेत.

advertisement

Kitchen Jugaad Video : बस्सं फक्त एक नारळ, डास चावणं दूर घराच्या आसपासही फिरकणार नाहीत

नेमकं करायचं काय?

प्लॅस्टिक कंटनेर घ्या. डबा असेल तर त्यावर झाकण असतं. या झाकणाला भोकं पाडा. एखादी टोकदार वस्तू किंवा काट्याचा चमचा घेऊन तो गॅसवर थोडा गरम करून त्याच्या मदतीनं झाकणाला छिद्र पाडा. एखाद्या भांड्याला झाकण नसेल त्याचं तोंड लहान असेल तर खाली थोडी जागा राहिल असं लक्षात घेऊन बाजूने छिद्र करा. जसं या व्हिडीओत दाखवलं आहे.

advertisement

आता या भांड्यात मीठ टाका, डिश वॉश डिटर्जंट किंवा कोणतंही लिक्विड डिटर्जंट टाका. हे मिठात मिक्स करा किंवा तसंच ठेवलं तरी काही हरकत नाही. आता यात फिनाईलच्या गोळ्या टाका. झाकण बंद करून हा डबा घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या.

Kitchen Jugaad Video : फ्रिजरखाली बांगडी टाकली आणि कमालच झाली

advertisement

याचा फायदा काय?

पावसाळ्यातील समस्यांपैकी एक म्हणजे घरात माश्या येणं. एरवी कधीच न दिसणाऱ्या माश्या पावसात मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येतात. घराबाहेरच नव्हे तर घरातही माशा फिरताना दिसतात. कितीही स्वच्छता ठेवा तरी या माश्या येतातच. याच माश्यांपासून हा जुगाड सुटका देईल. डब्यातील मिश्रणाच्या वासामुळे घरातील माश्या लगेच पळून जातील आणि एकही माशी घरात घुसणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

Maa, yeh kaise karun? युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : प्लॅस्टिक भांड्यांना होल, पावसाळ्यात प्रत्येकाने हे करायला हवं, मोठा फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल