लहाणपणी गोट्या खेळताना तुम्ही पालकांचा ओरडा खाल्ला असेल. किंवा आता तुम्ही तुमच्या मुलांना ओरडत असाल. पण याच गोट्या किचन मध्ये तुमचं मोठं काम हलकं करतील.
तुम्हाला करायचं काय आहे तर एक खोलगट ताट घ्या. त्यात गोट्या टाका. यावर एक दुसरं ताट ठेवा. आता हे ताट तुमच्या किचन कॅबिनेटमध्ये ठेवा. त्यावर केबिनेटमधील छोटे छोटे डब्बे ठेवा.
advertisement
Jugaad Video : केर काढण्यासाठीच नाही कपडे वाळवण्याच्या कामीही येते झाडू, अशी वापरा
आता तुम्ही पाहाल तर तुमचं विस्कळीत दिसणारं किचन कॅबिनेट एकदम व्यवस्थित दिसेल. शिवाय तुम्हाला हवा तो डब्बा सहज मिळेल. ताटावर ठेवलेलं ताट गोट्यांमुळे गरागरा फिरेल. तुम्हाला फक्त वरचं ताट हलवायचं आहे.
हा तुमचा घरगुती किचन कॅबिनेट स्पिनर तयार झाला.
@dippoutmon इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
Kitchen jugaad video : चहात साबण टाकून पाहा, फायदाच फायदा
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)