पेन आणि केळी तसा दोघांचाही एकमेकांशी काहीच संबंध नाही. पण जर का तुम्ही या दोघांचा हा उपाय एकदा पाहिला तर तो पुन्हा पुन्हा कराल. आता नेमकं करायचं काय आहे ते पाहुयात. महिलेनं व्हिडीओत दाखवल्यानुसार केळ्यांचा घड घ्यायचा आहे. त्यानंतर एक पेन घेऊन त्याच्या मधोमध एक दोरी बांधायची आहे. दोरीचं दुसरं टोक केळ्याच्या घडाच्या मधून दुसऱ्या बाजूने बाहेर काढायचं आहे. पेन केळ्याच्या घड्याला अडकेल त्यामुळे दोरी नीट अडकली जाईल. आता या दोरीमार्फत ही केळी तुम्ही तुम्हाला शक्य तिथं लटकवून ठेवा.
advertisement
Kitchen Jugaad Video : दूध गरम करताना कधी नेलपेंट टाकून पाहिलंय का? विचित्र पण जबरदस्त जुगाड
आता याचा फायदा काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्ही पाहिलं असेल बाजारातून केळी आणल्यानंतर ती पहिल्या दिवशी चांगली असतात. दुसऱ्या दिवशी थोडी नरम होतात आणि तिसऱ्या दिवशी तर आणखीच नरम होतं. केळी कोणत्याही पृष्ठभागावर ठेवल्याने त्यावर दाब पडतो आणि खालील केळी खराब होऊ लागतात. त्यामुळे केळी ठेवण्याची पद्धत बदला.
केळी पृष्ठभागावर आडवी ठेवण्याऐवजी ती पेन आणि दोरीच्या मदतीने लटकवून ठेवा. जेणेकरून ती पिकतील पण त्यावर दाब पडणार नाही आणि ती लवकर खराब होणार नाही, असा दावा या गृहिणीने केला आहे.
Priti Rasoi युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
Kitchen Jugaad Video : चहात थोडीशी टाल्कम पावडर टाका, होईल फायदा
सूचना - हा लेख व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.