Kitchen Jugaad Video : दूध गरम करताना कधी नेलपेंट टाकून पाहिलंय का? विचित्र पण जबरदस्त जुगाड
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Tips In Marathi : नेलपेंट आणि दूध दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. नेलपेंट सौंदर्यप्रसाधन तर दूध खाद्यपदार्थ. या दोन गोष्टी एकत्र याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. पण या दोघांचाही एकत्र अनोखा असा हा जुगाड एका महिलेनं दाखवला आहे.
नवी दिल्ली : जवळपास सगळ्यांच्या घरात दूध असतं. कुणी सकाळ, रात्र ग्लासभर दूध पितं, कुणी दुधाचा चहा पितं, तर कुणी कॉफी. दुधापासून इतर अनेक पदार्थही बनवले जातात. पण दुधाशीसंबंधित अनोखा असा जुगाड जो आजवर तुम्ही पाहिला नसेल.या जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. तो म्हणजे दुधात नेलपेंट टाकणं.
नेलपेंट आणि दूध दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. नेलपेंट सौंदर्यप्रसाधन तर दूध खाद्यपदार्थ. या दोन गोष्टी एकत्र याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. पण या दोघांचाही एकत्र अनोखा असा हा जुगाड एका महिलेनं दाखवला आहे. जो आजवर तुम्ही कधीच पाहिला नसेल. आता नेमका हा जुगाड आहे काय? हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
करायचं काय?
एका भांड्यात दूध घेऊन ते भांडं गॅसवर गरम करायला ठेवा. आता यावर भांड्यावर राहिल अशी एक गाळणी ठेवा. या गाळणीत तुमच्याकडे असलेल्या नेलपेंटच्या बाटल्या ठेवा आणि गाळणीवर झाकण ठेवा. दूध उकळत आलं ही गाळणी काढून घ्या.
advertisement
नेलपेंट टाकल्याने दूध खराब वगैरे होईल तर तसं बिलकुल नाही. भांड्यातल्या दुधावर याचा काहीच परिणाम होणार नाही, असं या महिलेनं सांगितलं आहे.
याचा फायदा काय?
आता नेलपेंट गरम दुधात ठेवण्याचा फायदा काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तुम्हाला माहिती असेल नेलपेंटच्या बाटलीतील नेलपेंट वापरलं नाही, किंवा थोडं जरी राहिलं तरी ते सुकू लागतं. कित्येक जण चांगल्या क्वालिटीच्या, महागड्या नेलपेंट घेतात. पण लावत नाही, तरी अशीच समस्या उद्भवते. आता इतक्या महाग नेलपेंट फेकणार कशा? तर त्याऐवजी त्या अशा पद्धतीने दुधात ठेवा. म्हणजे दुधाच्या वाफेवर त्या पुन्हा चांगल्या होतील आणि नखांवर नीट लावता येतील. महिलेने या व्हिडीओत ते करूनही दाखवलं आहे.
advertisement
Bridge for hungers या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही.)
Location :
Delhi
First Published :
June 21, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : दूध गरम करताना कधी नेलपेंट टाकून पाहिलंय का? विचित्र पण जबरदस्त जुगाड