TRENDING:

Kitchen Jugaad Video : गॅस सिलेंडरला बटाटा लावताच कमाल झाली, आश्चर्यकारक परिणाम

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : बटाट्याचा वापर आजवर तुम्ही स्वयंपाकात आणि त्वचेच्या समस्यांसाठी केला असेल पण एका गृहिणी याचा गॅस सिलेंडवरही वापर करून दाखवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : बटाटा म्हणजे आपल्या किचनमधील अविभाज्य असा भाग. म्हणजे प्रत्येकाच्या घरातील किचनमध्ये बटाटा असतोच. बटाट्याची भाजी, बटाटा वडा, बटाटा भजी... बटाट्यापासून असे कितीतरी पदार्थ बनवले जातात. कित्येक भाज्यांमध्ये बटाट्याचा वापर केला जातो. पण बटाट्याचा आणखी एक अनोखा असा वापर आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

तसं स्वयंपाकाशिवाय काही लोक बटाट्याचा वापर त्वचेच्या समस्येसाठीही करतात. त्वचा काळवंडली असेल, त्वचेवर काळे डाग असतील तर तिथं बटाटा चोळला जातो ज्यामुळे हा काळसरपणा कमी होतो असं म्हटलं जातं. पण तुम्ही कधी गॅस सिलेंडरला बटाटा लावून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.

Kitchen Jugaad Video : गॅस सिलेंडरसोबत ठेवा बांगड्या, जबरदस्त फायदा

advertisement

तुम्हाला करायचं काय आहे तर बटाटा घ्यायचा आहे आणि तो कापायचा आहे. आता हा कापलेला बटाटा तुम्हाला सिलेंडरच्या तळाला घासायचा आहे. याचा फायदा काय तर... तुम्ही पाहिलं असेल की सिलेंडरच्या तळाशी गंज पकडतो. त्याचे डाग फरशीला लागतात आणि सहसा ते जात नाहीत. पण सिलेंडरखाली असा बटाटा चोळल्याने गंज पकडणार नाही आणि ते फरशीला लागणार नाही.

advertisement

Aysha's Kitchen Hacks युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Kitchen Jugaad Video : कांदा वापरा पण पेपरचे तुकडे टाकूनच, पावसात मोठा फायदा

(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : गॅस सिलेंडरला बटाटा लावताच कमाल झाली, आश्चर्यकारक परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल